नागरिकांना देणार सेंद्रिय भाजीपाला; डॉ.पंदेकृविचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 02:23 PM2018-12-05T14:23:12+5:302018-12-05T14:23:32+5:30
अकोला : नागरिकांना विषमुक्त अन्न मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रयत्नशील असून,कृषी विद्यापीठात सेंद्रिय पिके,भाजीपाला संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
अकोला : नागरिकांना विषमुक्त अन्न मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रयत्नशील असून,कृषी विद्यापीठात सेंद्रिय पिके,भाजीपाला संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. येथे उत्पादन केलेला सेंद्रीय भाजीपाला नागरिकांना उपलब्ध करू न देण्यासाठी कृषी विद्यापीठात लवकरच स्टॉल उभारण्यात येणार आहेत.
सर्वच पिकांमध्ये वाढलेला कीटकनाशक रसायनाचा वारेमाप वापर मानवी आरोग्याला घातक ठरू लागला आहे. हा वापर कमी करण्यासाठी विविध पातळीवरू न शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. असे असले तरी, रसायनाचा हा वापर कमी न होताच अधिक वाढला आहे. या सर्व पृष्ठभूमीवर शेतकºयांना कृतीतून सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण व या माध्यमातून या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सेंद्रिय शेती (पदविका) प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. येथून प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थी, शेतकºयांनी सेंद्रिय पिके घेणे सुरू केले असून, यावर आधारित उद्योग सुरू केले आहे. सद्यस्थितीत कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी सेंद्रिय भाजीपाला निर्मिती करण्यावर भर देत असून, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञदेखील संशोधनावर भर देत आहेत.
कृषी विद्याशास्त्र विभागाच्या प्रक्षेत्रावर सध्या संशोधन करण्यात येत असून, याच प्रक्षेत्रावर शेतीसाठी लागणारे विविध जैव पदार्थ, खते, गांडूळ खते आदींची निर्मिती करण्यात आली आहे. भाजीपालाचे प्लॉट येथे लावण्यात आले आहेत. या भाजीपालाचे संगोपण शास्त्रज्ञ, कर्मचाºयांसह विद्यार्थी करीत आहेत. येथे तयार होणाºया विविध विषमुक्त भाज्या लवकरच नागरिकांना उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत. यासाठी स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये जवळपास सर्वच प्रकारचा भाजीपाला अकोलेकर नागरिकांना उपलब्ध करू न दिला जाणार आहे. यावर्षी येथे सेंद्रिय डाळी व इतर धान्य पीक घेण्यात आले आहे.
- सेंद्रिय भाजीपाला निर्मितीवर भर देण्यात आला असून, सर्वच प्रकारच्या भाज्या नागरिकांना उपलब्ध करू न देण्याचा मानस आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठात दालन खोलण्याचा विचार सुरू आहे.
डॉ. व्ही.एम. भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.