अकाेला : बीटी कपाशी उत्पादन, विपणनासाठी महाबीज साेबत कृषी विद्यापीठाचा करार
By राजेश शेगोकार | Updated: April 19, 2023 18:06 IST2023-04-19T18:06:11+5:302023-04-19T18:06:40+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून संशोधित नवीन संकरीत कपाशी बीटी वानांमध्ये बीटी बीजी २ जणूकाचा अंतर्भाव करण्याकरिता विद्यापीठ व महाबीज यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे.

अकाेला : बीटी कपाशी उत्पादन, विपणनासाठी महाबीज साेबत कृषी विद्यापीठाचा करार
अकाेला - डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून संशोधित नवीन संकरीत कपाशी बीटी वानांमध्ये बीटी बीजी २ जणूकाचा अंतर्भाव करण्याकरिता विद्यापीठ व महाबीज यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे.
राज्यातील शेतकरी बांधवांची मोठ्या बोंडाच्या कपाशीची वाढती मागणी लक्षात घेऊन कापूस संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्याद्वारे संशोधित संकरीत कपाशी वानामध्ये महाबीजमार्फत बीटी जनुकांचा अंतर्भाव करण्यात येईल.
या करारामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना मोठ्या बोंडाचे व अधिक उत्पादनशील संकरित कपाशी वाण लवकरच उपलब्ध होईल असा आशावाद यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केला. तर जनुकीय परिवर्तित कापूस वाणांच्या उत्पादन आणि विपणनात महाबीज सर्व क्षमतेने सहयोगाची भूमिका स्वीकारेल व यथाशीग्र सुधारित बीटी वाण शेतकरी बांधवांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाने संशोधित केलेल्या उडीद, भुईमूग, हरभरा आधी पिकांच्या जातींनी देशभरातील बहुतांश एरिया बहुतांश प्रदेशात असून, येणारे बीटीवान सुद्धा निश्चितच लोकप्रिय होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला. व सोयाबीनच्या पीडीकेवी अंबा व सुवर्ण सोया या वाणांचे पैदासकार बियाणे महाबीजला उपलब्ध करून दिल्यास त्यांचे सुद्धा शेतकरी वर्गांना उपलब्ध करून देता येतील अशी ग्वाही त्यांनी दिली.