कृषी विद्यापीठाचा मत्स्य बीज प्रकल्प बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 06:11 PM2018-11-26T18:11:07+5:302018-11-26T18:11:15+5:30

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा मत्स्य बीज प्रकल्प काम बंद पडल्याने यावर्षीही विदर्भातील मत्स्य पालन शेती करणाऱ्या शेतकºयांना मत्स्य बीज मिळविण्यासाठीची अडचन निर्माण झाली आहे.

Agriculture University's Fishery Seed Project closed | कृषी विद्यापीठाचा मत्स्य बीज प्रकल्प बंद

कृषी विद्यापीठाचा मत्स्य बीज प्रकल्प बंद

Next

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा मत्स्य बीज प्रकल्प काम बंद पडल्याने यावर्षीही विदर्भातील मत्स्य पालन शेती करणाऱ्या शेतकºयांना मत्स्य बीज मिळविण्यासाठीची अडचन निर्माण झाली आहे.
कृषी विद्यापीठाच्या विस्तीर्ण क्षेत्रावर हा प्रकल्प असून, मत्स्य बीज निर्मितीसाठी येथील विर्स्तीण जागेवर तळे बांधले आहेत. गोड्या पाण्यातील कथला,रोहू, मरळ व इतर जातींच्या मासोळीचे मत्स्य बीज येथे तयार केले जाते तसेच संशोधनाचेही काम सुरू करण्या आले होते. तथापि गतकाही वर्षापासून पूरक पाऊस नसल्याने हे काम ठप्प पडले आहे,तज्ज्ञ मणुष्यबळाचा अभावही यामागे दुसरे कारण आहे.
पारंपारिक शेतीसोबतच शेतकºयांचा मत्स्य पालन शेती करण्याकडे कल वाढला पण मत्स्यबीज मिळविण्यासाठी शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत असल्याने बहुतांश ठीकाणी शेतकºयांनी हा मत्स्य पालन व्यवसाय बंद केला आहे. कृषी विद्यापीठाने लाखोंच्या संख्येने मत्स्यबीज निर्मिती केली जात होती. लाखो रू पयाचे उत्पन्नदेखील या मत्स्यबीज प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी विद्यापीठाला मिळत होते.गत चारपाच वर्षापासून हा प्रकल्प बंद पडल्याने कृषी विद्यापीठाचे उत्पन्नदेखील बुडाले आहे.
यावर्षी कृषी विद्यापीठ परिसरात बºयापैकी पाऊस झाला, तळेदेखील पाण्याने भरले होते. त्यामुळे यावर्षी हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता होती तथापि मणुष्य बळाचा प्रश्न निर्माण झाल्याने मत्स्यबीज निर्मितीवर परिणाम झाला आहे.

शेतकºयांना मत्स्य शेतीसाठी मत्स्य बीज उपलब्ध करू न देण्यासाठी आम्ही तयार आहोत तथापि गत दोन चार वर्षापासून पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम झाला आहे. हा प्रकल्प पुन्हा नव्याने सुरू करू तसेच आवश्यक मणुष्यबळ यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
- डॉ. व्ही.एम. भाले,
कुलगुरू ,
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

 

Web Title: Agriculture University's Fishery Seed Project closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.