अकोल्यात साकारणार अँग्रो इको टुरिझम!
By admin | Published: February 13, 2016 01:48 AM2016-02-13T01:48:44+5:302016-02-13T01:48:44+5:30
डॉ.पंदेकृविच्या सीआरएसने पाठवला कुलगुरूकडे प्रस्ताव.
राजरत्न सिरसाट/अकोला : अकोल्यात बहुविध अँग्रो इको टुरिजम केंद्र असावे, यासाठीचा प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मध्यवती संशोधन केंद्राने(सीआरएस) या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्याकडे सादर केला आहे. पर्यावरण पुरक या पार्कसाठी ४ कोटी रू पये खर्च अपेक्षित असून, लवकरच हा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी पर्यटन केंद्र उभारण्यात आले होते. तथापि ही जागा विमानतळ धावपट्टीच्या विस्तारात जात असल्याने कृषी विद्यापीठाने नव्याने पयार्य शोधला असून, मत्स्य विभागाच्या १९ हेक्टर जागवेर अँग्रो टुरीजम सेंटर निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. मत्स्य विभागाच्या जागेवर घनदाट झाडे असून, या ठिाकणी मोठ,मोठी तळी आहेत. या ठिकाणाहून नाला वाहतो,घनदाट झाडे असल्याने या भागात हरण व इतर तत्सम प्राणीदेखील वावरतात. म्हणूनच कृषी विद्यापीठाने अँग्रो इको टुरीजम केंद्रासाठी या जागेची निवड केली आहे.
या जागेवर मुलांना खेळण्यासाठी व महिलांसाठी स्वतंत्र पार्क तसेच ज्येष्ठ नागरिकांना आपला वेळ मजेत घालवता यावा याकरिता ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील स्वतंत्र पार्क करण्यात येईल. या भागात वन्यप्राणण्यांची चहलपहल असल्याने जंगल सफारी चा आनंद पर्यटकाना लुटता यावा यावर देखील विचार करण्यात आला आहे. या ठिकाणी मत्स्य व इतर मोठे तळे , नाला असल्याने बोटींगची व्यवस्था निर्माण करण्यात येईल.
अकोला व नजिकच्या पर्यटक,चाकरमान्यांना सुटीच्या दिवशी आंनद लुटण्यासाठी एकही स्थळ नसल्याने हाच विचार करू न कृषी विद्यापीठाने अँग्रो इको टुरिजम सेंटरचही कल्पला मांडून या प्रकल्पाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार आहे.
जंगल सफारी, बोटींग व्यवस्थेवर देणार भर
मत्स्य विभागाच्या जागेवर जंगल असून, अनेक नागमोडी वळण आहेत. मोठय़ा आकराचे तलाव असल्याने येथे बोटींग शक्य असून,जंगल सफारीसाठीची सोय करता येणार आहे.पर्यटकांना मत्स्य संशोधन व संवर्धनाची माहिती येथे मिळणार आहे.