आदिवासी शेतक-यांचे कृषिप्रक्रिया उद्योग सुरू
By admin | Published: February 2, 2015 01:43 AM2015-02-02T01:43:44+5:302015-02-02T01:58:58+5:30
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्वतंत्र प्रशिक्षण वर्ग; जीवनसत्त्वयुक्त अन्नधान्य निर्माण करण्यावर भर.
अकोला : विदर्भातील आदिवासी शेतकर्यांमधून उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी त्यांना आधुनिक कृषी प्रक्रिया तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येत आहेत. याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात स्व तंत्र प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आला आहे. ३१ जानेवारी रोजी धारणी (जि. अमरावती) तालुक्यातील अतिदुर्गम कुसुमकोट येथे शेतकर्यांना जीवनसत्त्वयुक्त अन्नधान्य निर्माण करण्यासह विविध कृषिप्रक्रिया उद्योगांचे प्रशिक्षण देण्यात आले. खेड्यातला शेतमालावर खेड्यातच प्रक्रिया व्हावी, याकरिता या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत महिला शेतकरी बचतगटांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील कंझरा आणि अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी या दोन ठिकाणी सर्वसामान्य शेतकर्यांचे प्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएसआर) अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित प्रकल्प कापणीपश्चात तंत्रज्ञान विभागाच्या उ पयोजनेतून शेतमाल प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या कार्यक्रमांतर्गत आदिवासी शेतकर्यांना आधुनिक कृषिप्रक्रिया तंत्रज्ञान प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये उद्यमशीलता, उद्योजक निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. दर्याखोर्यांमध्ये राहणार्या या शे तकर्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयसीएसआरने कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केलेत. यासाठी आयसीएसआरने अखिल भारतीय समन्वयित प्रकल्प कापणीपश्चात तंत्रज्ञान विभागाला तीन लाखांचा निधी उपलब्ध केला आहे. .
विदर्भातील आदिवासी भागातील या शेतकर्यांना फळ प्रतवारी,कचराज्वलित शुष्क मिरची,कांदा निष्कासन यंत्र, डाळ गिरणी,जनावरांचे खाद्य तयार करणे आदी कृषिप्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या कृषी विद्यापीठाच्या कापणीपश्चात तंत्रज्ञान विभागाने आदिवासी भागाव्यतिरिक्त सर्वसामान्य शेतकर्यांना कृषिप्रक्रिया उद्योग प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले असून, अंजनगावसुर्जी ये थील नवृत्ती बारब्दे आणि मूर्तिजापूर तालुक्यातील सरिता शामसुंदर यांनी महिला बचतगटांच्या माध्यमा तून शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला आहेत. शेतीसह या शेतीपूरक उद्योगांमुळे त्यांच्या वार्षिक उत्पन्नात भर पडली आहे.