'अॅग्रोेटेक २0१७' कृषी प्रदर्शन : ७५ हजारांवर शेतकर्यांनी जाणून घेतले नव कृषी तंत्रज्ञान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 08:53 PM2017-12-27T20:53:19+5:302017-12-27T23:53:07+5:30
अकोला: राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोेटेक २0१७’च्या पहिल्याच दिवशी शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. पहिल्याच दिवशी कृषी विद्यापीठाच्या नोंदवहीत सायंकाळी ६ वाजतापर्यंत ७५ हजारांवर शेतकर्यांची नोंदणी झाली होती. या शेतकर्यांनी कृषी विद्यापीठाचे नव तंत्रज्ञान, संशोधन जाणून घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोेटेक २0१७’च्या पहिल्याच दिवशी शेतकर्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. पहिल्याच दिवशी कृषी विद्यापीठाच्या नोंदवहीत सायंकाळी ६ वाजतापर्यंत ७५ हजारांवर शेतकर्यांची नोंदणी झाली होती. या शेतकर्यांनी कृषी विद्यापीठाचे नव तंत्रज्ञान, संशोधन जाणून घेतले.
या कृषी विद्यापीठाने कृषी तंत्रज्ञान, संशोधनात बर्यापैकी काम केले असून, हेच विविध प्रकारचे शे ती, तंत्रज्ञान, संशोधन बघण्यासाठी शेतकर्यांनी गर्दी केली. कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावरच मोठे डोम त्यासाठी उभारण्यात आली आहेत. भविष्यात जमिनीशिवाय, अल्प मनुष्यबळात, कौशल्याधारित शेती शक्य आहे. यांत्रिकीकरणाचा पुरस्कार करीत आता जमिनीच्या मशागतीपासून तर थेट पक्का माल ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात यंत्रांची मदत कशी घेतली जाते, याचे प्रात्यक्षिकच येथे उपलब्ध आहे. संगणक नियंत्रित सिंचन प्रणाली, फवारण्याचे तंत्र, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा प्रभावी वापर, उपग्रहाच्या माध्यमातून अचूक हवामान अंदाज, अत्याधुनिक, स्वयंचलित शेती अवजारे, समूह शेती, गटशेतीची वाढत चाललेली व्याप्ती, नैसर्गिक, सेंद्रिय शेतीप्रती झुकलेला कल, एकात्मिक पीक तथा अन्नद्रव्य व्यवस्थापन, कृषी विद्यापीठाद्वारे विविध सामाजिक संस्थांच्या सहयोगाने मोबाइल संदेश, टीव्ही, रेडिओ, इंटरनेटचा वापर करीत प्रयोगशाळेत विकसित झालेले तंत्रज्ञान शेतकर्यांच्या बांधावर वेळेत कसे पोहोचविले जाणार, याची माहितीही येथे उपलब्ध आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संशोधित कृषी तंत्रज्ञान सर्व घटकांना एकाच जागी बघता यावे, सोबतच शेती शाश्वत आणि शेतकरी समृद्ध करण्यासाठी आपले योगदान देणार्या विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक, खासगी कंपन्यांची उत्पादने प्रत्यक्ष हाताळता यावे आणि शंका समाधान करता यावे, या उद्देशाने प्रदर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे.
मोबाइल अॅप करणार शेतकर्यांचे प्रबोधन!
विस्तार शिक्षण संचालनालयाच्यावतीने शिक्षण, शेतीसंदर्भातील इत्थंभूत माहिती देणारा मोबाइल अॅप सुरू करण्यात आला असून, तन व्यवस्थापनाची शास्त्रीय माहिती देण्यासाठी तन व्यवस्थापन विभागाच्यावतीने मोबाइल अँपची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली. कृषी विद्यापीठाच्या कृषी संवादनीचे विमोचनही करण्यात आले.