अॅग्रोेटेक २0१७ : शेतकर्यांना घातली आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनाने भुरळ; दुसर्या दिवशीही प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 08:41 PM2017-12-28T20:41:19+5:302017-12-28T20:53:09+5:30
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात यावर्षी आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन, शेती करण्याच्या आधुनिक पद्धती शेतकर्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सौर ऊर्जा, प्रक्रिया उद्योगासाठीचे आधुनिक यंत्र तंत्रज्ञान, आधुनिक कांदा चाळणी बघण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी गर्दी करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात यावर्षी आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन, शेती करण्याच्या आधुनिक पद्धती शेतकर्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सौर ऊर्जा, प्रक्रिया उद्योगासाठीचे आधुनिक यंत्र तंत्रज्ञान, आधुनिक कांदा चाळणी बघण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी गर्दी करीत आहेत.
यंदाच्या कृषी प्रदर्शनात ३00 च्यावर तंत्रज्ञान, संशोधनाचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत. कमी खर्चाची आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी शेतकर्यांची लगबग दिसून आली. कृषी विद्यापीठाने प्रक्रिया उद्योगासाठीचे यंत्र येथे प्रात्यक्षिक स्वरू पात उपलब्ध केले आहेत. शेतकरी बचत गटांच्या सदस्यांनी प्रक्रिया यंत्राची माहिती उत्सुकतेने जाणून घेतली. फलोत्पादन शेतीकडे विदर्भातील शेतकरी वळला आहे. उद्यान विद्या विभागाने संशोधित केलेली बीरहित मोसंबी, लिंबू तसेच विविध भाजीपाला पिके ब्रोकोली आदींची माहिती शेतकर्यांनी जाणून घेतली. सौर ऊज्रेवरील यंत्र, कीटकनाशके, फवारणी यंत्रे बघण्यासाठी विद्यार्थी, शेतकर्यांनी मोठी गर्दी केली. संरक्षित शेतीच भविष्यात तारणार असल्याने संरक्षित शेतीसाठीचे तंत्रज्ञान शेतकर्यांनी जल व मृद संधारण विभागाच्या शास्त्रज्ञांकडून जाणून घेतले. हवामान बदल व पावसाची अनिश्चितता बघता शेतकरी त्रस्त आहेत. अखिल भारतीय कोरडवाहू संशोधन प्रकल्प विभागाने कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञान शेतकर्यांसाठी येथे ठेवले आहे. शेतकर्यांनी आस्थेने हे तंत्रज्ञान जाणून घेतले. कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागाने देशातील व राज्यातील जातिवंत गायी, म्हैशी, शेळ्य़ांचे जतन केले आहे. या गायी, म्हशी, शेळी पालनाकडे शेतकर्यांनी वळून शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी याठिकाणी शेतकर्यांना माहिती उपलब्ध करून दिली आहे, तसेच शेतात शेततळे करून त्यात मत्स्य व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्य विभागाकडून मार्गदर्शन केल्या जात आहे.
कीटकशास्त्र विभागाच्यावतीने पिकांवर येणारी कीड व त्या किडींचे व्यवस्थापन कसे करावे, यासंबंधीची विस्तृत माहिती शेतकर्यांना देण्यात येत आहे. गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान पाहता, कीटकशास्त्र व संशोधन विभागाने गुलाबी बोंडअळीचा पादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून दिली जात आहे. राज्यभरातून आलेल्या बचत गटांचे साहित्य, प्रक्रिया केलेला विविध शेतमाल शेतकर्यांसोबतच नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
एका क्लिकवर तण व्यवस्थापनाची माहिती
तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्पांतर्गत पीडीकेव्ही वीड मॅनेजर हे अँप विकसित केले असून, ते प्ले स्टोअरमधून घेता येते. विविध पिकांच्या तण व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती, फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याची माहिती आहे. कोणत्या पिकाला कोणते तणनाशक वापरावे व त्याची मात्रा किती असावी, याची संपूर्ण माहिती अँपद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होते. हे अँप डॉ. एस.पी. देशमुख, डॉ. एस.यू. काकडे यांनी विकसित केले.
छाया: २९ सीटीसीएल: