सुधारित आकृतिबंधासाठी कृषी सहायक आक्रमक

By admin | Published: June 22, 2017 04:43 AM2017-06-22T04:43:11+5:302017-06-22T05:14:32+5:30

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ.

Agrochemical Assistant Aggressor for improved formulation | सुधारित आकृतिबंधासाठी कृषी सहायक आक्रमक

सुधारित आकृतिबंधासाठी कृषी सहायक आक्रमक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहायक संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हे आंदोलन टप्प्या-टप्प्याने करण्यात येत असून, १२ ते १४ जूनदरम्यान काळय़ा फिती लावून कामकाज १५ ते १७ जूनदरम्यान लेखणीबंद व त्यानंतर १९ जून रोजी धरणे आंदोलनानंतर कृषी सहायकांनी बुधवार, २१ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला.
कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंधाबाबत अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, तसेच पदे वर्ग करण्याला कृषी सहायकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यानुसार संघटनेच्या नेतृत्वाखाली कृषी सहायकांनी सात टप्प्यांत आंदोलन करण्याचे ठरविले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात अधिकार्‍यांना निवेदन देण्यात येऊन काळी फीत लावून निषेध व्यक्त करण्यात आला होता. लेखणीबंद आंदोलनदेखील करण्यात आले. आंदोलनातील तिसर्‍या टप्प्यानुसार १९ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहायकांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात बुधवारी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश लांडे, कार्याध्यक्ष संजय पातोंड, सचिव कमलसिंग जाधव, कोषाध्यक्ष रवींद्र माळी यांच्या नेतृत्वात जिल्हय़ातील कृषी सहायकांनी साखळी उपोषणास सुरुवात केली. सदर साखळी उपोषण २३ जूनपर्यंंत सुरू राहणार आहे. सुधारित आकृतिबंध तातडीने तयार करावा, कृषी सहायकांमधून कृषी पर्यवेक्षकांची पदे १00 टक्के पदोन्नतीने भरण्यात यावी, कृषिसेवक पदाचा तीन वर्षांंचा कालावधी शिक्षणसेवकांप्रमाणे आश्‍वासित प्रगती योजना व इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरावा, आंतरविभागीय बदल्या नियमित व्हाव्या, या मागण्यांचे निवेदन यावेळी संघटनेतर्फे देण्यात आले आहे. उपोषण मंडपात जिल्हाभरातून आलेले कृषी सहायक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Web Title: Agrochemical Assistant Aggressor for improved formulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.