अ‍ॅग्रोेटेक २0१७ : एकेकाळी वाहतुकीसाठी वापर होणा-या दमणीची सैर आता दुर्लभच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 11:42 PM2017-12-27T23:42:03+5:302017-12-27T23:51:22+5:30

एकेकाळी याच दमणीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत होता. नववधू-वरांची मिरवणूक, नवरीला आणण्यासाठी दमणी हे प्रतिष्ठेचे वाहन होते. पण, आज दमणी दुर्लभ झाली. कृषी विद्यापीठाने 'अँग्रोटेक २0१७' कृषी प्रदर्शनात शेतकर्‍यांना सैर करण्यासाठी दमणी आणली आहे.  

AgroTech 2017: Rarely used to transport the bamboo to the traffic once! | अ‍ॅग्रोेटेक २0१७ : एकेकाळी वाहतुकीसाठी वापर होणा-या दमणीची सैर आता दुर्लभच!

अ‍ॅग्रोेटेक २0१७ : एकेकाळी वाहतुकीसाठी वापर होणा-या दमणीची सैर आता दुर्लभच!

Next
ठळक मुद्देकृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकर्‍यांना अनुभवायला मिळतेय दमणीची सैर पंढरपुरी बैलांनी जुंपलेल्या दमणीची सैर काही निराळीच!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : प्रदर्शनाच्या निमित्ताने येथे दमणीची सैर शेतकर्‍यांना अनुभवायला मिळत आहे. एकेकाळी याच दमणीचा वापर मोठय़ा प्रमाणात होत होता. नववधू-वरांची मिरवणूक, नवरीला आणण्यासाठी दमणी हे प्रतिष्ठेचे वाहन होते. पण, आज दमणी दुर्लभ झाली. कृषी विद्यापीठाने 'अ‍ॅग्रोेटेक २0१७' कृषी प्रदर्शनात शेतकर्‍यांना सैर करण्यासाठी दमणी आणली आहे.  
बुधवारपासून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास सुरुवात झाली. या प्रदर्शनामध्ये कृषी तंत्रज्ञानासोबतच, कृषी अवजारे, पशुधन, विविध प्रकारच्या कडधान्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. कृषी तंत्रज्ञान अवगत करण्यासोबतच शेतकर्‍यांना आणि अकोलेकर खवय्यांना विविध प्रकारच्या खमंग, चमचमीत खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठीसुद्धा स्टॉल लावण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांनी लावलेल्या स्टॉलवरील खाद्य पदार्थ जिभेला पाणी आणत आहेत. कृषी प्रदर्शनामध्ये पंढरपुरी बैलांनी जुंपलेल्या दमणीची सैर करण्याची व्यवस्थासुद्धा आयोजकांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. महिला बचत गटांच्या स्टॉलवरील चुलीवरील मांडे, आवळा, खवा मिक्स पुरणपोळी, रानगवर्‍यांवर भाजलेले खर्रमखुर्रम रोडगे, चुलीवरची भाकरींचा शेतकरी आणि अकोलेकर नागरिक चांगलाच आस्वाद घेत आहेत. 

Web Title: AgroTech 2017: Rarely used to transport the bamboo to the traffic once!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.