महापौरांनी ठराव दिल्यावरच १५ लाखांच्या मदतीवर शिक्कामोर्तब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 11:59 AM2020-04-11T11:59:17+5:302020-04-11T11:59:21+5:30
निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला महापौरांच्या ठरावाची आवश्यकता लागणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोनाचा मुकाबला करताना कर्तव्यावर हजर असणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना १५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला महापौरांच्या ठरावाची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी क्रमप्राप्त ठरणार आहे.
महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची दाट लोकवस्तीमध्ये घरे असल्यामुळे या भागात संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत या संकटावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावल्याचे चित्र आहे.
यादरम्यान कर्तव्यावर हजर असणाºया मनपा कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला १५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय ९ एप्रिल रोजी महापालिकेने घेतला. हा निर्णय घेत असताना प्रशासनाच्या या प्रस्तावाला महापौर अर्चना मसने यांच्या ठरावाची आवश्यकता भासणार आहे. तसेच हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेच्या समोर सादर करावा लागेल. हा ठराव मंजूर केल्यानंतरच खºया अर्थाने पंधरा लाखांच्या मदतीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
कोरोनाशी मुकाबला करताना या संकटसमयी आम्ही सर्वपक्षीय पदाधिकारी, नगरसेवक मनपा कर्मचाºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. सर्वसाधारण सभा न झाल्यास प्रशासनाच्या प्रस्तावाला कार्योत्तर मंजुरी दिली जाईल, यात दुमत नाही.
- अर्चना मसने, महापौर.