महिलेची हत्या करणा-यास आजन्म कारावास

By admin | Published: March 18, 2015 01:35 AM2015-03-18T01:35:53+5:302015-03-18T02:02:57+5:30

रिधोरा येथील बहुचर्चित वंदना ढगे हत्याकांडातील आरोपीस आजन्म कारावास.

Ajnem imprisonment for killing woman | महिलेची हत्या करणा-यास आजन्म कारावास

महिलेची हत्या करणा-यास आजन्म कारावास

Next

अकोला: रिधोरा येथील बहुचर्चित वंदना ढगे हत्याकांडातील आरोपी सुभाष इंगळे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. सावदेकर यांच्या न्यायालयाने मंगळवारी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच एक हजार ५00 रुपये दंडही ठोठावला.
रिधोरा येथील रहिवासी वंदना लक्ष्मण ढगे (४0) यांची ८ फेब्रुवारी २0१४ रोजी गावातीलच सुभाष रामकृष्ण इंगळे याने हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी त्याला १0 फेब्रुवारी २0१४ रोजी अटक केली. पोलीस कोठडीत असताना सुभाष इंगळे याने आपला गुन्हा कबूल केला आणि हत्येसाठी वापरलेली कुर्‍हाड, रक्ताने माखलेले कपडे व घटनास्थळावर मिळालेल्या वंदना ढगे यांच्या बांगड्या पोलिसांनी जप्त केल्या.
सुभाष इंगळे हा मध्यवर्ती कारागृहात असताना त्याच्यावर आधी कलम ३0७ आणि नंतर ३0२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. सावदेकर यांच्या न्यायालयात झाली. त्यांनी १७ साक्षीदारांच्या साक्षी घेतल्या. यामध्ये आरोपी सुभाष इंगळे याच्याविरुद्ध आढळलेल्या ठोस पुराव्यावरून न्यायालयाने त्याला कलम ३0२ मध्ये आजीवन सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.

Web Title: Ajnem imprisonment for killing woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.