अकाेला जिल्ह्यातील सुधारित आणेवारी ५० पैशांच्या वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 11:15 AM2020-11-07T11:15:52+5:302020-11-07T11:16:43+5:30
Akola Agriculture News यंदा पीक आणेवारी मात्र ५० पैशांच्या वर ६७ पैसे आली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : बाेगस बियाणे, ओल्या दुष्काळाचे सावट, परतीच्या पावसाने दिलेला तडाखा, कापसावर आलेली बाेंडअळी अशी संकटांची मालिका कायम असतानाही यंदा पीक आणेवारी मात्र ५० पैशांच्या वर ६७ पैसे आली आहे. त्यामुळे अंतिम आणेवारी ५० पैशांच्या आत आली तरच मदतीची आस आहे, अन्यथा अस्मानी संकटासाेबतच सुलतानी संकटाची टांगती तलवार शेतकऱ्याांवर आहे.
या वर्षीच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस व पुरामुळे जिल्ह्यात ७४ हजार ७४९ शेतकऱ्यांचे ५१ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. पाऊस व पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत मदतीची घोषणा करण्यात आली आहे; मात्र मदतनिधी अद्याप प्राप्त नाही. दुसरीकडे सुधारित आणेवारीही ५० पैशांच्या वर निघाल्याने मदतीबाबत साशंकताच व्यक्त केली जात आहे.
परतीच्या पावसाने लाखाेंचे नुकसान
१ ते २२ ऑक्टोबरदरम्यान परतीच्या पावसाने जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी पंचनामे करण्यात आले नाही.
पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानाची मदत मिळणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.