अकाेल्यात आमदारांनी गाव राखले जि प अध्यक्षांनी गमावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:20 AM2021-01-19T04:20:57+5:302021-01-19T04:20:57+5:30
अकाेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा भाेजने या भांबेरी या गावातील रहिवासी आहेत. तेल्हारा तालुक्यात वंचित व भाजप यांच्यामध्ये वर्चस्वाची ...
अकाेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभा भाेजने या भांबेरी या गावातील रहिवासी आहेत. तेल्हारा तालुक्यात वंचित व भाजप यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई असते. यावेळी भाेजने यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला असून केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे व अकाेला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांच्या पळसाे बढे या गावात वंचित बहुजन आघाडीचे ९ उमेदवार विजयी झाले तर भाजपचे चार उमेदवार जिंकले, मात्र येथील सत्ता ही तडजाेडीनेच हाेणार असल्याचीच चर्चा आहे. बाळापूर मतदारसंघाचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या सस्ती या गावात त्यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. अकाेट तालुक्यातील कुटासा ग्रामपंचायतमध्ये आमदार अमाेल मिटकरी हे आमदार झाल्यानंतरच्या निवडणुकीचे नेतृत्व केले त्यामध्ये त्यांना घवघवीत यश मिळाले. बाळापूर तालुक्यातील निमकर्दा गावात माजी आ. नारायणराव गव्हाणकर यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवित तालुका काँग्रेस अध्यक्ष अजय ताथोड यांच्या पॅनेलने ९ पैकी ९ जागी विजयी मिळविला. अकाेला पंचायत समितीचे सभापती संपतराव नागे यांच्या पॅनेलचा पैलपाडा ग्रामपंचायतमध्ये धुवा उडवला. मूर्तिजापूर कुरुम येथून पंचायत समिती माजी उपसभापती व माजी सरपंच उमेश मडगे पराभूत, भटोरी माजी पंचायत समिती उपसभापती विनायकराव कावरे यांचे पुत्र शेखर कावरे पराभूत, मूर्तिजापूर तालुक्यातील भटोरी ग्रामपंचायत राष्ट्रवादी ओबीसी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुषमा कावरे पराभूत झाल्या आहेत