अकाेला पाेलिसांना पाेलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:23 AM2021-09-04T04:23:28+5:302021-09-04T04:23:28+5:30
अकोला जिल्हा घटकातील २ गुन्ह्यांची सर्वोत्कृष्ट अन्वेषण व अपराध सिध्दीकरिता निवड होऊन तपास करणारे अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ...
अकोला जिल्हा घटकातील २ गुन्ह्यांची सर्वोत्कृष्ट अन्वेषण व अपराध सिध्दीकरिता निवड होऊन तपास करणारे अधिकारी व अंमलदार यांना पोलीस महासंचालक यांच्याकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सर्वाेत्कृष्ट अपराधसिध्दी या बक्षिसाकरीता सिव्हील लाइन्स पाेलिसांना पाेलिस महासंचालक यांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे़ बलात्कार व पाेस्काे प्रकरणाचा तपास याेग्यरीत्या करून आराेपीला शिक्षा मिळविण्यात पाेलिसांना यश आले़ त्यामुळे सिव्हील लाइन्सचे ठाणेदार भानुप्रताप मडावी, सहायक पाेलीस निरीक्षक विशाल नांदे, रवींद्र काटकर, श्रीकांत गावंडे, यांना राेख २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे़ यासाेबतच सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्यात दाखल असलेला रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांविरुध्द फसवणुकीचा तसेच अन्न व औषध प्रशासन कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन प्रमुख शैलेश सपकाळ, पाेलीस उपनिरीक्षक सागर हटवार, राजपालसिंह ठाकूर, गणेश पांडे व गाेपाल पाटील यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलिसांना सर्वाेत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठी हे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे़ यासाठी पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी मार्गदर्शन केले़ अकाेला पाेलिसांना गत तीन महिन्यात हे दुसरे बक्षीस जाहीर झाले आहे़