अकाेला पाेलिसांना अपर पाेलीस महासंचालकांचे पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:14 AM2021-07-21T04:14:39+5:302021-07-21T04:14:39+5:30
अकोट फैल येथील रहिवासी जावेद हुसेन अली यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनला दुचाकी चोरीचा तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी ...
अकोट फैल येथील रहिवासी जावेद हुसेन अली यांनी रामदास पेठ पोलीस स्टेशनला दुचाकी चोरीचा तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून, तपास सुरू केल्यानंतर रामदास पेठ पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून, त्यांनी आराेपी शुभम शंकरमार्गे राहणार आरपीटीएस रोड लहरीयानगर जुने शहर, शेख महेबूब शेख इलियाज रा.भगतवाडी खैर मोहम्मद प्लॉट, रिजवान उर्फ लाला खान रियाज खान राहणार आरटीपीएस लहरीयानगर, या तीन चाेरट्यांना अटक केली. या चाेरट्यांची पाेलिसांनी कसून चाैकशी केली असता, या चोरट्यांनी सात चोरीचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना दिली. या चोरट्यांकडून २ लाख ३० हजारांच्या दुचाकीसह इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत प्रल्हादराव इंगळे, शेख हसन, गजानन खेडकर, श्रीकांत पातोंड, रामदास पेठ पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी केली होती.
चाेरीचे सात गुन्हे उघड
पाेलिसांनी सात चाेरीचे गुन्हे उघडकीस आणल्यानंतर, तब्बल दाेन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एकाच टाेळीकडून एवढ्या माेठ्या प्रमाणात चाेरलेल्या दुचाकी जप्त केल्याने पाेलिसांची ही कामगिरी सरस ठरली. त्यामुळे या कारवाईची अपर पोलीस महासंचालकांनी दखल घेऊन त्यांनी रामदास पेठ पाेलिसांना सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत करण्याचे पदक जाहीर केले आहे.