अकाेलेकरांकडे २०३ काेटींचा मालमत्ता कर थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:22 AM2021-09-22T04:22:55+5:302021-09-22T04:22:55+5:30
महापालिका प्रशासनाने अवाजवी करवाढ केल्याचा आराेप करीत, काँग्रेसने करवाढीच्या विराेधात नागपूर खंडपीठात आव्हान दिले. नागपूर खंडपीठाने याचिका निकाली काढत ...
महापालिका प्रशासनाने अवाजवी करवाढ केल्याचा आराेप करीत, काँग्रेसने करवाढीच्या विराेधात नागपूर खंडपीठात आव्हान दिले. नागपूर खंडपीठाने याचिका निकाली काढत मनपाच्या करवाढीला फेटाळून लावले. त्यावर मनपाने या निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, मालमत्ता कराची रक्कम कमी हाेइल, या अपेक्षेने अकाेलेकरांनी थकबाकी जमा करण्यास हात आखडता घेतला आहे. त्याचा परिणाम मनपाच्या गंगाजळीवर झाला असून, आगामी दिवसांत वसुली न झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनाची समस्या निर्माण हाेण्याची दाट शक्यता आहे, शिवाय सणासुदीच्या दिवसांत मूलभूत साेईसुविधांची कामे प्रभावित हाेण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता, मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी मालमत्ता कर विभागाचा आढावा घेतला असता, थकबाकीचा मुद्दा समाेर आला. त्यामुळे नागरिकांना कर जमा करण्याचे आवाहन आयुक्त द्विवेदी यांनी केले आहे.