अकाेलेकर बेफिकीर;१९२ जणांना काेराेनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:17 AM2021-04-14T04:17:15+5:302021-04-14T04:17:15+5:30
फेब्रुवारी महिन्यापासून महापालिका क्षेत्रात काेराेनाचा प्रसार वाढत असल्याचे समाेर आले आहे. दुकाने खुली करण्यासाठी परवानगी हवी असेल तर जिल्हा ...
फेब्रुवारी महिन्यापासून महापालिका क्षेत्रात काेराेनाचा प्रसार वाढत असल्याचे समाेर आले आहे. दुकाने खुली करण्यासाठी परवानगी हवी असेल तर जिल्हा प्रशासनाने काेराेना चाचणी बंधनकारक केली. त्यामुळे शहरातील व्यापारी, दुकानांमधील कामगारांच्या स्तरावर चाचण्या केल्या जात आहेत़ काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ हाेत असल्याचे समाेर येताच चाचणी केंद्रांमध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. बाजारपेठेत,दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांकडून नियम पायदळी तुडविल्या जात आहेत. परिणामी शहरात काेराेनाचा प्रसार झाला असून मंगळवारी १९२ जणांना काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे़
पूर्व झाेनमध्ये काेराेनाचा कहर
शहरात फेब्रुवारी महिन्यापासूनच काेराेना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते़ यातही पूर्व व दक्षिण झाेनमध्ये काेराेनाचा उद्रेक झाला आहे़ मंगळवारी पूर्व झोनमध्ये काेराेनाचे ९० रुग्ण आढळून आले. तसेच पश्चिम झोनमध्ये १९, उत्तर झोनमध्ये ५० व दक्षिण झोनमध्ये ३३ असे एकूण १९२ रुग्ण आढळून आले आहेत.
१२११ जणांनी दिले नमुने
शहरात दिवसेंदिवस काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. मनपाने शहरात झाेननिहाय चाचणी केंद्र सुरू केले असून मंगळवारी १२११ जणांनी चाचणी केल्याचे समाेर आले. यामध्ये २५७ नागरिकांनी आरटीपीसीआर चाचणी केली. तसेच ९५४ जणांची रॅपिड ॲंटिजेन चाचणी केली. संबंधितांचे अहवाल पुढील तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.