मनपाच्या नाकर्तेपणामुळेच अकाेलेकरांच्या नशिबी नरकयातना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:13 AM2021-07-24T04:13:42+5:302021-07-24T04:13:42+5:30
मनपा प्रशासनाने नालेसफाईकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा न हाेता ते नागरिकांच्या घरात शिरले. यामुळे गरिबांचे कुटुंब उघड्यावर आल्याचे ...
मनपा प्रशासनाने नालेसफाईकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा न हाेता ते नागरिकांच्या घरात शिरले. यामुळे गरिबांचे कुटुंब उघड्यावर आल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी आमदार मिटकरी यांच्या निदर्शनास आणून देत जुने शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार बळवंत अरखराव व महसूल यंत्रणेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित हाेते. आर्थिक नुकसानीचा पंचनामा करुन ताे पुढील कार्यवाहीसाठी तातडीने सादर करण्याचे निर्देश आ.मिटकरी यांनी दिले. यावेळी प्रदेश संघटक रफिक सिद्दीकी , नगरसेविका उषा विरक, नगरसेवक नितीन झापर्डे, अब्दुल रहीम पेंटर, माजी गटनेता मनाेज गायकवाड, माजी नगरसेविका सुषमा निचळ, संतोष डाबेराव, याकूब पहेलवान आदी उपस्थित हाेते.
साथीला आळा घालण्यासाठी आराेग्य शिबीर
सखल भागातील रहिवाशांच्या आराेग्याची समस्या निर्माण हाेण्याची शक्यता पाहता नागरिकांना वैद्यकीय आराेग्य सुविधा देण्यासाठी राष्ट्रवादी सरसावली आहे. आराेग्य विभागाच्या मदतीने शनिवार व रविवारी या परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. नागरिकांनी आराेग्य तपासणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महानगराध्यक्ष विजय देशमुख यांनी केले आहे.