अकोला जिल्हा परिषदेवर भारिपचे वर्चस्व कायम !

By Admin | Published: July 1, 2016 12:19 AM2016-07-01T00:19:32+5:302016-07-01T00:19:32+5:30

अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्षपदी जमीरखा पठाण.

Akhola Zilla Parishad is dominated by Bharipat! | अकोला जिल्हा परिषदेवर भारिपचे वर्चस्व कायम !

अकोला जिल्हा परिषदेवर भारिपचे वर्चस्व कायम !

googlenewsNext

अकोला: जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाच्या संध्या वाघोडे अध्यक्षपदी आणि उपाध्यक्षपदी जमीरखा अतीउल्लाखा पठाण यांची निवड करण्यात आली. महाआघाडीचा पराभव करीत अध्यक्ष -उपाध्यक्षपदावर विजय मिळविलेल्या भारिप-बमसंने जिल्हा परिषदेतील वर्चस्व कायम राखले आहे.
पुढील अडीच वषार्ंच्या कालावधीसाठी जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी गुरुवारी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. तत्पूर्वी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंंत जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी व उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी भारिप-बमसंच्या सदस्य संध्या वाघोडे व उपाध्यक्षपदासाठी भारिप-बमसंचे जमीरखा अतीउल्लाखा पठाण आणि शिवसेना-भाजप, काँग्रेस, अपक्ष मिळून महाआघाडीच्यावतीने अध्यक्षपदासाठी अपक्ष सदस्य नितीन देशमुख (टाले) व उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या ज्योत्स्ना बहाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सदस्यांचे हात उंचावून मतदान घेण्यात आले. एकूण ५१ सदस्यांपैकी ४९ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी भारिप-बमसंच्या संध्या वाघोडे व उपाध्यक्षपदासाठी भारिप-बमसंचेच जमीरखा पठाण यांना प्रत्येकी २६ तर महाआघाडीच्यावतीने अध्यक्षपदासाठी नितीन देशमुख व उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या ज्योत्स्ना बहाळे यांच्या बाजूने प्रत्येकी २३ सदस्यांनी मत नोंदविले. एक अपक्ष सदस्य राजेश खोने अनुपस्थित होते तर शिवसेनेचे सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी न होता तटस्थ राहिले. २६ मते मिळविलेल्या भारिप-बमसंच्या संध्या वाघोडे यांची अध्यक्षपदासाठी तर जमीरखा पठाण यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. भाजप-शिवसेना युतीसह काँग्रेस व अपक्ष मिळून तयार करण्यात आलेल्या महाआघाडीचा पराभव करून, पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय प्राप्त केलेल्या भारिप-बमसंने जिल्हा परिषदेतील आपले वर्चस्व कायम राखले आहे. या निवडणुकीचे पीठासीन अधिकारी म्हणून अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी काम पाहिले. त्यांना तहसीलदार डॉ.रामेश्‍वर पुरी, नायब तहसीलदार पूजा माटोडे, प्रतीक्षा तेजनकर, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.एम.कुळकर्णी व सर्मथ शेवाळे यांनी सहकार्य केले.

अध्यक्ष-उपाध्यक्षपदांसाठी असे झाले मतदान!
भारिप-बमसं            सदस्य          महाआघाडी         सदस्य
भारिप-बमसं              २४                  भाजप             १२
शिवसेना                   0१                शिवसेना             0६
राष्ट्रवादी काँग्रेस         0१                काँग्रेस                0४
                                                    अपक्ष                 0१
....................................................................................
एकूण                        २६                                         २३

Web Title: Akhola Zilla Parishad is dominated by Bharipat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.