अकोल्यात एसटीचा शतप्रतिशत चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:17 PM2017-10-17T13:17:39+5:302017-10-17T13:19:38+5:30

अकोला : एसटी कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेदमुत संपाचे हत्यार उपसण्यात आले. अकोल्यात या संपाला शतप्रतिशत यश मिळाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान पोलिस तसेच उपप्रादेशीक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी स्कुल बसची व्यवस्था करून प्रवाशांना दिलासा दिला.

Aklol ST's 100% flyover | अकोल्यात एसटीचा शतप्रतिशत चक्का जाम

अकोल्यात एसटीचा शतप्रतिशत चक्का जाम

Next
ठळक मुद्देपोलिसांसह, परिवहन विभागाने केली खाजगी बसची सोय

अकोला : एसटी कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेदमुत संपाचे हत्यार उपसण्यात आले. अकोल्यात या संपाला शतप्रतिशत यश मिळाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान पोलिस तसेच उपप्रादेशीक परिवहन विभागाच्या अधिकाºयांनी स्कुल बसची व्यवस्था करून प्रवाशांना दिलासा दिला.
राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागात १९०० बस फेºया दररोज होतात. त्यामाध्यमातून १.३० लाख प्रवाशांची दररोज वाहतूक होते व यामुळे एसटीला दररोज ३५ ते ४० लाखाचे उत्पन्न होते. या संपामुळे ऐन दिवाळीत एसटीचे दिवाळे निघाले आहे.
एसटी कर्मचाºयांच्या विविध मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. आश्वासनांच्या पलीकडे शासन ठोस निर्णय घेत नसल्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना सतत निवेदने देऊनही कर्मचाºयांच्या मुद्यावर तोडगा निघत नसल्याचे पाहून बेमुदत संपाचा बिगुल फुंकला असल्याचे इंटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गरड यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारी मध्यरात्री अकोला आगारासह जिल्हाभरातील आगार, एसटी वर्कशॉप येथे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे़ वाहन, चालक तसेच यांत्रिक विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत़

Web Title: Aklol ST's 100% flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.