कोरोना रुग्णांमध्ये १० टक्के बालकांचा समावेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:10 AM2020-06-08T10:10:35+5:302020-06-08T10:10:43+5:30

कोरोनाबाधितांची संख्या ८१३ वर पोहोचली असून, त्यामध्ये १८ वर्षाखालील जवळपास १० टक्के बालकांचा समावेश आहे.

In Akola 10% of corona patients are children! | कोरोना रुग्णांमध्ये १० टक्के बालकांचा समावेश!

कोरोना रुग्णांमध्ये १० टक्के बालकांचा समावेश!

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊन दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. या कालावधीत कोरोनाबाधितांची संख्या ८१३ वर पोहोचली असून, त्यामध्ये १८ वर्षाखालील जवळपास १० टक्के बालकांचा समावेश आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दोन महिन्यांपासून शहरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. रुग्णांमध्ये सर्वाधिक आकडा १८ ते ३५ व ३५ ते ५० वयोगटातील आहे. तर मृत्यूदर हा ५० पेक्षा जास्त वयोगटातील रुग्णांमध्ये असून, या रुग्णांना कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांच्याही समस्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
रुग्णांच्या वाढत्या संख्यामध्ये चिमुकल्यांचा ही आकडा लक्षणीय वाढत आहे.
१८ वर्षे वयोगट खालील जवळपास शंभर मुला-मुलींना कोरोनाची बाधा झाली आहे. ही चिंतेची बाब असून, चिमुकल्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

तीन ते चार टक्के रुग्णांनाच लक्षण
अठरा वर्षाखालील बहुतांश बाधित रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नसल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली. केवळ तीन ते चार टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याचेही निदर्शनास आले.

विशेष काळजी घ्या!
१८ वर्षाखालील बालकांमध्ये कोरोनाचा वाढता धोका
बालकांना घराबाहेर निघणे टाळा
वारंवार हात स्वच्छ धुण्यास सांगा
मास्कचा वापर करा
मोठ्यापासून मुलांना दूर ठेवा

Web Title: In Akola 10% of corona patients are children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.