अकोला : महावितरणसमोर दर दिवशी १४ कोटी ५४ लाख वसुलीचे उद्दीष्ट

By Atul.jaiswal | Published: March 23, 2024 06:25 PM2024-03-23T18:25:13+5:302024-03-23T18:25:29+5:30

मार्च महिन्याच्या उर्वरित आठ दिवसांमध्ये दररोज १४ कोटी ५४ लाख रुपये वसुल करावे लागणार आहेत.

Akola 14 54 crore collection target per day in front of Mahavitaran | अकोला : महावितरणसमोर दर दिवशी १४ कोटी ५४ लाख वसुलीचे उद्दीष्ट

अकोला : महावितरणसमोर दर दिवशी १४ कोटी ५४ लाख वसुलीचे उद्दीष्ट

अकोला : वापरलेल्या वीजेचे पैसे भरण्यास ग्राहकांकडून टाळाटाळ होत असल्याने महावितरणच्याअकोला परिमंडळातील थकबाकी १९५ कोटी ७८ लाख रुपयांवर पोहोचली असून, मार्च महिन्याच्या उर्वरित आठ दिवसांमध्ये दररोज १४ कोटी ५४ लाख रुपये वसुल करावे लागणार आहेत.

मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे आणि दिलेल्या उद्दीष्टानुसार परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून १९५ कोटी ७८ लाख रूपयाचे थकीत वीजबिल वसुल होणे गरजेचे आहे. परंतु मागील २३ दिवसात केवळ ९३ कोटी ९९ लाख रूपयेच वीजबिलाचे वसुल झाल्याने उर्वरीत १०१ कोटी ७९ लाख रूपयाच्या वसुलीसाठी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या मार्गदर्शनात परिमंडलात विभाग, उपविभाग, शाखा कार्यालयानुसार वीजबिल वसुली मोहीम तीव्र करण्यात आल्या आहेत. या मोहिमेत महावितरण कर्मचारी हा ग्राहकांच्या दारापर्यंत जाऊन वीजबिल भरण्याचे आग्रह धरत आहेत.

प्रादेशिक संचालक वसुली मोहीमेत

वीज बिल वसुली करणाऱ्या अभियंते व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नागपूर प्रादेशिक संचालक सुहास रंगारी शनिवारी अकोला येथे वीजबिल वसुली मोहिमेत सहभागी झाले. थकबाकीदार ग्राहक वीजबिल भरण्यास प्रतिसादच देत नसेल त्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक यांनी मोहिमेदरम्यान दिलेत. मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर, प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता हरीष गजबे, पवनकुमार कछोट वीजबिल वसुली मोहिमेत सहभागी झाले होते.

दररोजच्या वसुलीचे असे आहे उद्दीष्ट
जिल्हा - वसुल करावे लागणार
अकोला - ४ कोटी ४५ लाख
बुलढाणा - ७ कोटी ३० लाख
वाशिम : २ कोटी ७८

सार्वजनिक सुट्टीला सुरू राहणार वीजबिल भरणा केंद्रे
महावितरण वीजबिल वसुलीसाठी ग्राहकांच्या दारात पोहचत आहे.ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे कार्यालयीन वेळेत सार्वजनिक सुट्टीतही सुरू ठेवण्यात आली आहे.याशिवाय ग्राहकांना महावितरण मोबाईल एप ,संकेतस्थळ यासोबत ऑनलाईन वीजबिल भरण्याचीही सोय उपलब्ध आहे.

Web Title: Akola 14 54 crore collection target per day in front of Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.