Akola: महिन्याला अडीच लाखांवर वीजग्राहक भरतात ऑनलाइन बिल, महावितरण अकोला परिमंडळ
By Atul.jaiswal | Published: August 29, 2023 05:20 PM2023-08-29T17:20:19+5:302023-08-29T17:21:27+5:30
Akola: महावितरण अकोला परिमंडळात टेक्नोसेव्ही ग्राहकांची संख्या वाढत असुन प्रत्येक महिन्याला सरासरी २ लाख ५० हजारापर्यंत ग्राहक ऑनलाईन वीजबिल भरण्याला पसंती देत आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला - महावितरण अकोला परिमंडळात टेक्नोसेव्ही ग्राहकांची संख्या वाढत असुन प्रत्येक महिन्याला सरासरी २ लाख ५० हजारापर्यंत ग्राहक ऑनलाईन वीजबिल भरण्याला पसंती देत आहे. डीजीटल इंडीया इनिशिएटीव्हचा भाग म्हणून महावितरणच्या ग्राहकांना ऑनलाईन वीज बिल भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ग्राहकांनी महावितरणच्या ऑनलाईन सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण अकोला परिमंडलाच्या वतीने करण्यात आले आहे.
परिमंडळात जून महिन्यात २ लाख ३९ हजार ८५४,तर जुलै महिन्यात २ लाख ५८ हजार ९०७ ग्राहकांनी अनुक्रमे ६२ कोटी आणि ६७ कोटी ५० लाख रूपयाचा ऑनलाईन वीज देयकाचा भरणा केला आहे. ग्राहकांनी ऑनलाईन पध्दतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त रु. ५००) इतकी सवलत देण्यात आलेली आहे.
ऑनलाइनचे विविध पर्याय
महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाईन पध्दतीने विनामर्यादा विजदेयकाचा भरणा करता येवू शकतो. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पध्दतीत ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो. तसेच भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत देखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो.
ऑनलाईन पध्दतीने विजदेयकाचा भरणा करणे अत्यंत सुरक्षित असून या पध्दतीस रिझर्व बँकेच्या पेमेंट व सेटलमेंट कायदा २००७ च्या तरतूदी लागू आहेत.
- फुलसिंग राठोड
(जनसंपर्क अधिकारी, महावितरण, अकोला परिमंडळ)