अकोला ४५.१
By admin | Published: May 8, 2017 02:47 AM2017-05-08T02:47:42+5:302017-05-08T02:47:42+5:30
सकाळपासूनच होणार्या उकाड्याने नागरिक त्रस्त
अकोला : यंदाचा उन्हाळा अकोलेकरांसाठी चांगलाच त्रासदायक ठरत आहे. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठला असून, रविवारी पारा ४५.१ अंशांवर पोहोचला. त्यामुळे सकाळपासूनच होणार्या उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते.दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने शहरातील रस्ते ओस पडले होते. यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून, पाच दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. दुसरीकडे महावितरणही आपत्कालीन भारनियमनाच्या नावाखाली तीन ते चार तास वीज पुरवठा खंडित करीत असल्याने अकोलेकरांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस तापणार्या उन्हामुळे घरातून बाहेर पडणेदेखील कठीण झाले आहे.
मे महिन्याचा हा पहिलाच आठवडा सुरू आहे. यापुढे अजून तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.