अकोला : ‘लीज’ वरील ७७ भूखंडधारकांनी केला अटी-शर्तींचा भंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:22 PM2018-03-30T13:22:20+5:302018-03-30T13:22:20+5:30

​​​​​​​अकोला : शहरातील शासन मालकीच्या नझुलच्या भाडेपट्ट्यावर (लीज) देण्यात आलेल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे.

Akola: 77 landowners on 'lease' violate terms and conditions! | अकोला : ‘लीज’ वरील ७७ भूखंडधारकांनी केला अटी-शर्तींचा भंग!

अकोला : ‘लीज’ वरील ७७ भूखंडधारकांनी केला अटी-शर्तींचा भंग!

Next
ठळक मुद्देभाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या शहरातील १२८ भूखंडांची तपासणी महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या पथकांमार्फत पूर्ण करण्यात आली.अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार भाडेपट्ट्यावरील ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. भाडेपट्ट्यावरील संबंधित भूखंडधारकांविरुद्ध महसूल विभागामार्फत लवकरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

- संतोष येलकर

अकोला : शहरातील शासन मालकीच्या नझुलच्या भाडेपट्ट्यावर (लीज) देण्यात आलेल्या भूखंडांची तपासणी महसूल विभागामार्फत पूर्ण करण्यात आली असून, त्यामध्ये ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. अटी-शर्तींचा भंग करणाऱ्या भूखंडधारकांविरुद्ध महसूल विभागामार्फत लवकरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
अकोला शहरातील विविध ठिकाणी शासन मालकीच्या नझुलच्या जमिनीवरील भूखंड निवासी, वाणिज्यीक व औद्योगिक इत्यादी प्रयोजनासाठी भाडेपट्ट्यावर देण्यात आले आहेत. अटी व शर्तींना अधीन राहून भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या शहरातील १२८ भूखंडांची तपासणी महसूल मंडळ अधिकारी व तलाठ्यांच्या पथकांमार्फत पूर्ण करण्यात आली असून, तपासणीचा अहवाल अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार भाडेपट्ट्यावरील ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अटी-शर्तींचा भंग करणाºया भाडेपट्ट्यावरील संबंधित भूखंडधारकांविरुद्ध महसूल विभागामार्फत लवकरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

अटी-शर्तींचा असा करण्यात आला भंग !
भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या भूखंडांच्या ७७ प्रकरणांत संबंधित भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केला आहे. त्यामध्ये जागेच्या वापरात (प्रयोजन) बदल ,महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता भूखंडाची विक्री करणे व भूखंडधारकाच्या नावात बदल करणे इत्यादी प्रकारच्या अटी व शर्तींचा भंग करण्यात आला आहे.

१.१० कोटींचा दंड वसूल!
शहरातील शासन मालकीच्या जमिनीवरील भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या भूखंडांपैकी अटी व शर्तींचा भंग केल्याच्या प्रकरणात गत दोन महिन्यात (२८ मार्चपर्यंत ) २५ भूखंडधारकांकडून १ कोटी १० लाख ५६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरातील नझूलच्या जमिनीवरील भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या १२८ भूखंडांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामध्ये ७७ भूखंडधारकांनी अटी व शर्तींचा भंग केल्याचे आढळून आले आहे. शासन निर्णयानुसार अटी-शर्तींचा भंग करणाºया भाडेपट्ट्यावरील भूखंडधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
-संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, अकोला.

 

Web Title: Akola: 77 landowners on 'lease' violate terms and conditions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.