Akola: अपहरण प्रकरण; आणखी २ आराेपींच्या मुसक्या आवळल्या, रामदास पेठ पाेलिसांनी केली अटक

By आशीष गावंडे | Published: May 21, 2024 11:13 PM2024-05-21T23:13:22+5:302024-05-21T23:13:52+5:30

Akola Crime News: एक कोटी रूपये खंडणी मागण्याच्या उद्देशातून अपहरण करण्यात आलेले व्यावसायिक अरुणकुमार वाेरा यांच्या अपहरणात सहभागी असलेल्या आणखी दाेन आराेपींच्या मुसक्या पाेलिसांनी आवळल्या.

Akola: Abduction case; 2 more arrestees were arrested by Ramdas Peth police | Akola: अपहरण प्रकरण; आणखी २ आराेपींच्या मुसक्या आवळल्या, रामदास पेठ पाेलिसांनी केली अटक

Akola: अपहरण प्रकरण; आणखी २ आराेपींच्या मुसक्या आवळल्या, रामदास पेठ पाेलिसांनी केली अटक

- आशिष गावंडे 
अकोला - एक कोटी रूपये खंडणी मागण्याच्या उद्देशातून अपहरण करण्यात आलेले व्यावसायिक अरुणकुमार वाेरा यांच्या अपहरणात सहभागी असलेल्या आणखी दाेन आराेपींच्या मुसक्या पाेलिसांनी आवळल्या. रामदास पेठ पाेलिसांनी मंगळवारी चंदन उर्फ चंदू अरुण इंगळे व मनीष उर्फ मन्या गजानन गाेपनारायण यांना अटक केली. याप्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

रामदास पेठ पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या चार जीन परिसरातून व्यावसायिक अरुणकुमार वोरा यांचे १३ मे राेजी रात्री दहा वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी अपहरण केले होते. परंतु वाेरा यांचा माेबाइल झटापटीत खाली पडल्यामुळे आरोपी वोरा यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकले नाहीत. पाेलिसांचा वाढता दबाव पाहता १५ मे राेजी रात्री एक वाजताच्या सुमारास आरोपींनी वोरा यांना एका ऑटोत बसवून घरी पाठवले. त्याच रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पाेलिस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने वेगाने तपास चक्रे फिरवीत १६ मे राेजी पहाटेपर्यंत पाच अपहरणकर्त्यांना बेड्या ठाेकल्या हाेत्या. १७ मे राेजी सहावा आराेपी सरफराज खान उर्फ राजा रा.कान्हेरी सरप याला अटक केल्यानंतर २१ मे राेजी रामदास पेठ पाेलिस स्टेशनचे कर्मचारी किशाेर गवळी, संताेष गवइ, आकाश जामाेदे यांनी चंदन उर्फ चंदू अरुण इंगळे (१९)रा.जेतवन नगर खदान व मनीष उर्फ मन्या गजानन गाेपनारायण (२१) रा.शिर्ला अंधारे यांना शिताफीने अटक केली. पुढील तपास रामदास पेठचे पाेलिस निरीक्षक मनाेज बहुरे करीत आहेत. 

आराेपींना आज काेर्टात हजर करणार
रामदास पेठ पाेलिसांनी अटक केलेल्या उपराेक्त दाेन्ही आराेपींना उद्या बुधवारी न्यायालयासमाेर हजर केले जाणार आहे. यापूर्वी अटक केलेल्या पाच आराेपींची पाेलिस काेठडी उद्या संपुष्टात येइल. तर मिथुन उर्फ माेंटी इंगळे याची यापूर्वीच न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Web Title: Akola: Abduction case; 2 more arrestees were arrested by Ramdas Peth police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.