Akola: संदेशखाली प्रकरणी अभाविपची अकोल्यात निदर्शने
By Atul.jaiswal | Published: March 6, 2024 06:35 PM2024-03-06T18:35:56+5:302024-03-06T18:36:10+5:30
Akola News: पश्चिम बंगाल राज्यातील संदेशखाली येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने (अभाविप) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार, ६ मार्च रोजी निदर्शने करण्यात आली.
- अतुल जयस्वाल
अकोला - पश्चिम बंगाल राज्यातील संदेशखाली येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने (अभाविप) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवार, ६ मार्च रोजी निदर्शने करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करून आरोपींना कठोरात कठाेर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना जिल्हाधिकऱ्यांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या हिंसाचार व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यात तेथील पोलीस अपयशी ठरल्यामुळे या घटनेतील महिलांना न्याय देण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणी अभाविपने निवेदनात केली आहे. संदेशखाली प्रकरणातील आरोपींना स्थानिक राज्य सरकारचे अभय असल्याचा आरोपही अभाविपने निवेदनातून केला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास संस्थांकडून करावा व आरोपींविरुद्ध तातडीने कारवाई करावी असेही अभाविपने निवेदनात म्हटले आहे. निवेदन सादर करण्यापूर्वी अभाविपच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली.