Akola: १६ मेपूर्वी कापूस बियाण्याची विक्री केल्यास होणार कारवाई! कृषी विभागाचे आदेश

By रवी दामोदर | Published: May 6, 2024 04:07 PM2024-05-06T16:07:59+5:302024-05-06T16:09:50+5:30

Akola News: राज्यात  २०१७ च्या खरीप हंगामातील शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भावाचा अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला. यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रिय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

Akola: Action will be taken if cotton seeds are sold before May 16! Orders of the Department of Agriculture | Akola: १६ मेपूर्वी कापूस बियाण्याची विक्री केल्यास होणार कारवाई! कृषी विभागाचे आदेश

Akola: १६ मेपूर्वी कापूस बियाण्याची विक्री केल्यास होणार कारवाई! कृषी विभागाचे आदेश

- रवी दामोदर 
अकोला - राज्यात  २०१७ च्या खरीप हंगामातील शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भावाचा अनुभव लक्षात घेऊन त्यानंतर कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळून आला. यंदाच्या खरीप हंगामामध्ये शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी क्षेत्रिय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी दि. १६ मे २०२४ पासून कापूस बियाणे  शेतकऱ्यांना उपलब्ध होणार  आहे. त्यापूर्वी बियाण्याची विक्री केल्यास संबंधित कंपनी, किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होणार आहे. यासंदर्भात कृषी विभागाने विभागीय कृषी सहसंचालक यांना आदेशित केले आहे.

कापूस शास्त्रज्ञांच्या मतानुसार शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. हंगामपुर्व कापूस लागवड झाल्यास शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत यंदा शेंदरी बोंड अळीच्या प्रार्दुभावास आळा घालण्याकरीता हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही. या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी दि. १६ मेपासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन प्रत्यक्ष लावगड ही १ जून २०२४ नंतरच होणार आहे. कटाक्षाने पालन केल्यास शेंदरी (गुलाबी) बोंड अळीचा प्रादुर्भाव प्रभावीपणे नियंत्रीत करणे शक्य होणार आहे. याकरीता क्षेत्रीयस्तरावर कटाक्षाने पालन करणे बाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी काटेकोर नियोजन करुन अंमलबजावणी करावी व विभागीय कृषि सहसंचालक यांनी त्यावर सनियंत्रण ठेवावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
 
कापूस बियाणे पुरवठा करणेबाबत निर्देशित दिनांक पुढीलप्रमाणे

१. उत्पादक कंपनी ते वितरक ०१ मे २०२४ ते १० मे २०२४.

२. वितरक ते किरकोळ विक्रेता १० मे २०२४ नंतर

३. किरकोळ विक्रेता ते शेतकरी १५ मे २०२४ नंतर

४. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लागवड १ जूननंतर
 

कापूस बियाण्याची विक्री दुकानदार यांनी शेतकऱ्यांना १५ मे नंतर करता येईल, परंतु शेतकरी बांधवांनी सेंद्रिय बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता १ जून नंतरच बियाण्याची लागवड करावी. 
- शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

Web Title: Akola: Action will be taken if cotton seeds are sold before May 16! Orders of the Department of Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.