अकोला : पतीने साथ सोडल्यानंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 10:14 PM2018-02-19T22:14:07+5:302018-02-19T22:14:24+5:30
सायखेड (अकोला): बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड येथील श्रीधर इंगळे यांनी पत्नीच्या उपचाराकरिता पैसे नसल्यामुळे सात महिन्यांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. किडनीच्या आजाराशी संघर्ष करीत अखेर त्यांच्या पत्नी धृपताबाई इंगळे यांनीही १८ फेबु्रवारी रोजी अकोला जिल्हा सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना जगाचा निरोप घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क

धृपताबार्इंच्या दोन्हीही किडन्या निकामी झाल्याने त्यांना वाचविण्यासाठी पतीने स्वत:ची एक किडनी देण्याचे ठरविले होते; परंतु त्यापूर्वीच त्यांचा घात झाला. दारिद्र्यात जीवन जगत असताना पत्नीवर महागडे उपचार कसे करावे, शासनाच्या आरोग्य विभागाकडे दुर्धर आजारासाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठी अर्ज करूनही मदत मिळाली नाही,अशातच त्यांनी नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविले. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी हिम्मत न हारता आईला वाचविण्यासाठी धडपड केली. कसेबसे जमविलेल्या पैशातून उपचार सुरू ठेवले; परंतु जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना आईनेही साथ सोडली. याचा धक्का इंगळे कुटुंबाला बसला. धृपताबाई इंगळे यांच्यावर १९ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. पती पत्नीच्या मृत्युमुळे गावावर शोककळा पसरली आहे.