Akola: अकोला-तिरुपती विशेष एक्स्प्रेस सप्टेंबर अखेरपर्यंत धावणार

By Atul.jaiswal | Published: June 24, 2024 06:30 PM2024-06-24T18:30:59+5:302024-06-24T18:31:25+5:30

Akola-Tirupati Special Express: दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने अकोला-तिरुपती-अकोला विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एकदा असलेली ही रेल्वे आता २९ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.

Akola: Akola-Tirupati Special Express will run till the end of September | Akola: अकोला-तिरुपती विशेष एक्स्प्रेस सप्टेंबर अखेरपर्यंत धावणार

Akola: अकोला-तिरुपती विशेष एक्स्प्रेस सप्टेंबर अखेरपर्यंत धावणार

- अतुल जयस्वाल
अकोला - दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेने अकोला-तिरुपती-अकोला विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एकदा असलेली ही रेल्वे आता २९ सप्टेंबरपर्यंत धावणार आहे.

नांदेड रेल्वे विभाग कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ०७६०६ अकोला-तिरुपती ही साप्ताहिक गाडी ७ जुलै ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दर रविवारी ८:१० वाजता अकोला स्थानकावरून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ६:२५ वाजता तिरुपती स्थानकावर पोहोचणार आहे.

०७६०५ तिरुपती-अकोला ही साप्ताहिक गाडी ५ जुलै ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी १२:३० वाजता तिरुपती स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी अकोला स्थानकावर १२:१५ वाजता येणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन अशा एकूण २६ फेऱ्या होणार आहेत. या रेल्वेला दोन महिन्यांची मुदतवाढ मिळाल्याने अकोलेकर प्रवाशांना तिरुपतीला जाणे शक्य होणार आहे.

Web Title: Akola: Akola-Tirupati Special Express will run till the end of September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.