अकोला : महावितरण कंपनीच्या ‘एटीपी’ केंद्रातील रोकड लुटणारे चौघे कारागृहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 09:58 PM2017-12-31T21:58:13+5:302017-12-31T22:01:52+5:30
अकोला: दुर्गा चौकातील महावितरण कंपनीच्या एटीपी केंद्राचे छत तोडून आत प्रवेश करून ५ लाख ६0 हजार रुपयांची रोकड लुटणार्या चौघा आरोपींना रविवारी न्यायाधीश सैदाणे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क

२१ डिसेंबर रोजी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास एटीपी केंद्रामध्ये दरोडा घालून इलेक्ट्रिशियन संतोष राजाराम भटकर (३२), वसंत नारायण महाराज आणि काले खान महेमूद खान, शंकर धामणे (रा. विजय नगर) यांनी सुरक्षा रक्षक सुधीर मधुकर लाळे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर आरोपींनी एटीपी मशीनमधील ५ लाख ६0 रुपयांची रोकड लुटून नेली. २२ डिसेंबर रोजी पहाटे पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. आरोपींच्या पोलीस कोठडीची रविवारी मुदत सं पल्याने, पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दिला.