अकोला : शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:27 PM2019-01-18T12:27:45+5:302019-01-18T12:28:27+5:30

अकोला : तोष्णीवाल ले-आउटमधील शासकीय दूध डेअरी परिसरातील एसी प्लांटचा पाइप लिकेज झाल्यामुळे अमोनियाची प्रचंड प्रमाणात गळती झाल्याने या परिसरातील नागरिकांना डोळे, श्वास व दम लागण्याचा त्रास झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला.

Akola: Ammonia leak in government milk dairy | अकोला : शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळती

अकोला : शासकीय दूध डेअरीत अमोनियाची गळती

googlenewsNext

अकोला : तोष्णीवाल ले-आउटमधील शासकीय दूध डेअरी परिसरातील एसी प्लांटचा पाइप लिकेज झाल्यामुळे अमोनियाची प्रचंड प्रमाणात गळती झाल्याने या परिसरातील नागरिकांना डोळे, श्वास व दम लागण्याचा त्रास झाल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला. अग्निशमन दलाच्या आठ बंब पाण्याने ही गळती रोखण्याचे प्रयत्न सुरूच असून, एसी प्लांटमधील अमोनिया दुसऱ्या एका टाक्यात साठविण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही पाइप व टाकीतील काही अमोनिया अद्याप गळत असल्याने अग्निशमन विभागाने त्यावर पाण्याचा मारा सुरूच ठेवला आहे.
शासकीय दूध डेअरी परिसरात पाठीमागच्या बाजूला एसी प्लांट कार्यान्वित आहे. या प्लांटमधील एका पाइपला गुरुवारी सायंकाळी अचानक लिकेज झाला. त्यामुळे अमोनियाची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली. काही नागरिकांना श्वास, दमा व डोळ्याला खाज येण्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांनी परिसरात पाहणी केली असता कुंभकर्णी झोपेत असलेल्या शासकीय दूध डेअरीतील अधिकारी व कर्मचाºयांच्या हलगर्जीने अमोनियाची गॅस गळती सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांना या घातक प्रकाराची माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला दिल्यानंतर अग्निशमन विभागाच्या तीन वाहनांद्वारे या गळतीवर पाणी टाकणे सुरू करण्यात आले; मात्र कर्मचाºयांनाही श्वास घेण्याचा प्रचंड त्रास होत असल्याने कर्मचारी बदलून वारंवार पाण्याचा मारा सुरू ठेवण्यात आला. आठ बंब पाणी रिचविल्यानंतर येथील गॅस गळतीचा त्रास कमी झाला, तसेच बाजूलाच असलेल्या एका रिकाम्या टाकीमध्ये अमोनिया गॅस साठविण्यात आला; मात्र तरीही पाइप व टाकीतील काही अमोनियाची गळती सुरूच असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या गळतीची माहिती मिळाल्यानंतर खदानचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्यासह सिव्हिल लाइन पोलीसही घटनास्थळावर दाखल झाले होते. मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख रमेश ठाकरे यांनीही तळ ठोकून ही गळती रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
 
शासकीय दूध डेअरीचे अधिकारी निष्काळजी
शासकीय दूध डेअरीत अमोनिया गॅस गळती सुरू झालेली असताना येथील अधिकारी मात्र कुंभकर्णी झोपेत होते. त्यांना या गळतीची कल्पनाही नव्हती. परिसरातील नागरिकांनी अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर ही गळती रोखण्यासाठी तसेच दुसºया टाकीत साठविण्यासाठी प्रयत्न झाले; मात्र येथील अधिकाºयांचा कारभारात हलगर्जी असल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 

Web Title: Akola: Ammonia leak in government milk dairy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.