कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची चाचणी अकोल्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2020 11:22 AM2020-02-09T11:22:46+5:302020-02-09T11:22:58+5:30

या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.

AKOLA : Amount of Debt waiver to be deposit in farmers account | कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची चाचणी अकोल्यात!

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची चाचणी अकोल्यात!

Next

- संतोष येलकर
अकोला: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची चाचणी शासनामार्फत घेण्यात येणार आहे. ही चाचणी घेण्यासाठी शासनामार्फत अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी १२ फेबु्रवारी रोजी घेण्यात येणाºया या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या राज्यातील शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील थकबाकीदार शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या २१ फेबु्रवारी रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी घेण्यासाठी शासनामार्फत अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, १२ फेबु्रवारी रोजी घेण्यात येत असलेल्या या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे. चाचणी यशस्वी झाल्यानंतर कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

तालुकास्तरीय गठित होणार तक्रार निवारण समित्या!
कर्जमाफी योजनेंतर्गत राज्यातील जिल्हानिहाय कामाचा आढावा ७ फेबु्रवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घेतला. कर्जमाफी संदर्भात शेतकºयांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुका स्तरावर तक्रार निवारण समित्या गठित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार कर्जमाफी संदर्भात शेतकºयांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अकोला जिल्ह्यासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्या गठित करण्यात येणार आहेत.

कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी घेण्यासाठी शासनामार्फत अकोला जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी.

 

Web Title: AKOLA : Amount of Debt waiver to be deposit in farmers account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.