आजपासून अकोला-अमरावती ‘नॉन स्टॉप’ बस सेवा
By Admin | Published: October 3, 2016 02:39 AM2016-10-03T02:39:11+5:302016-10-03T02:39:11+5:30
३ ऑक्टोबरपासून अकोला ते अमरावतीदरम्यान ‘नॉन स्टॉप’ बस सेवा सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या प्रादेशिक अधिका-यांनी घेतला आहे.
अकोला, दि. 0२- प्रवाशांच्या सुविधेसाठी ३ ऑक्टोबरपासून अकोला ते अमरावतीदरम्यान ह्यनॉन स्टॉपह्ण बस सेवा सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या प्रादेशिक अधिकार्यांनी घेतला आहे.
अमरावती प्रादेशिक विभाग नियंत्रक यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक व सहा. वाहतूक अधीक्षक (चालन) उपस्थित होते. अकोला-अमरावती मार्गावर विनाथांबा जलद बस सेवा सुरू करण्यात यावी, ही मागणी गेल्या अनेक वर्षांंपासून प्रादेशिक तथा विभागीय अधिकार्यांकडे प्रलंबित होती. प्रवाशांच्या वेळेची बचत व एसटीची उत्पन्न वाढ, असा दुहेरी उद्देश डोळय़ांसमोर ठेवून अमरावती प्रादेशिक अधिकार्यांनी ये त्या सोमवारपासून प्रादेशिक विभागांतर्गत ठरावीक मार्गांंवर विनाथांबा, विनावाहक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारपासून अकोल्याच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून दिवसभरात १२ फेर्या अमरावतीकरिता सोडण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक अधिकार्यांनी ह्यलोकमतह्णला दिली. अकोला विभाग नियंत्रक रोहन पलंगे हे सोमवारी सकाळी या जलद सेवेला प्रारंभ करणार आहेत. एरवी अकोल्यावरून निघणार्या बसला अमरावतीला पोहोचण्यास किमान २.३0 ते ३ तास लागतात. जलद बस सेवेमुळे हा प्रवास ४५ मिनिटांनी कमी होणार आहे.