अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : कामगारांच्या प्रश्नाची आज फुटणार कोंडी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:41 PM2020-02-22T12:41:48+5:302020-02-22T12:42:00+5:30
बाजार समिती प्रशासन आणि माथाडी कामगारांमध्ये होणाºया चर्चेत माथाडी कामगारांच्या प्रश्नावरून निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कामाचे दर वाढवून देण्याच्या प्रलंबित प्रश्नावर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने, बाजार समितीमधील शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार ठप्प झाला. त्यामुळे शेतमालाची खरेदी-विक्री सुरळीत करण्यासाठी माथाडी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न शनिवारी बाजार समितीकडून करण्यात येणार असून, त्यामध्ये माथाडी कामगारांच्या प्रश्नावरून निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतमालाची उतराई-भराई, मोजमाप (काटा) करणे इत्यादी कामाचे दर वाढवून देण्याच्या प्रलंबित प्रश्नावर बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी २० फेबु्रवारी रोजी दुपारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. माथाडी कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केल्याने, बाजार समितीमधील शेतमाल खरेदी-विक्रीचा व्यवहार ठप्प झाला. त्यामुळे शेतमालाची खरेदी-विक्री सुरळीत करण्यासाठी माथाडी कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न २२ फेबु्रवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात येणार आहे. बाजार समिती प्रशासन आणि माथाडी कामगारांमध्ये होणाºया चर्चेत माथाडी कामगारांच्या प्रश्नावरून निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
कामाचे दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी गुरुवारी दुपारी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे बाजार समितीमधील प्रभावित झालेली शेतमाल खरेदी-विक्री सुरळीत करण्यासाठी शनिवारी माथाडी कामगारांसोबत चर्चा करून, त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
-शिरीष धोत्रे, सभापती, अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती.