Akola: बिस्कीट पुड्यावरून वाद, बहिणीची हत्या करणाऱ्या भावास पाेलिस काेठडी
By सचिन राऊत | Published: January 14, 2024 08:52 PM2024-01-14T20:52:38+5:302024-01-14T20:53:44+5:30
Akola News: रागाच्या भरात माेठ्या भावाने गळा दाबून बहीनीची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आल्यानंतर डाबकी राेड पाेलिसांनी आराेपी भावाला अटक करून रविवारी न्यायालयासमाेर हजर केेले असता न्यायालयाने आराेपी भावास १६ जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.
- सचिन राऊत
अकोला - अवघ्या पाच रुपयांच्या बिस्किटांच्या पुड्याचा वाद ११ वर्षांच्या चिमुकलीच्या जिवावर बेतला. रागाच्या भरात माेठ्या भावाने गळा दाबून बहीनीची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आल्यानंतर डाबकी राेड पाेलिसांनी आराेपी भावाला अटक करून रविवारी न्यायालयासमाेर हजर केेले असता न्यायालयाने आराेपी भावास १६ जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.
डाबकी राेड पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील अमानतपूर, ताकोडा या गावात घाटोळे यांच्या शेतात मध्यप्रदेशातील चौहान कुटुंबीय वीट भट्टीवर हातमजुरीचे काम करतात. शुक्रवार १२ जानेवारी रोजी या शेतशिवारामध्ये अकरा वर्षीय चिमुकली गोपी गुलाब चाैहान व तिचा माेठा भाऊ गोकुळ गुलाब चौहान या बहीण भावांमध्ये बिस्कीट पुड्यावरून वाद झाला. गोकुळने गोपीकडील बिस्किटचा पुडा हिसकावून घेत त्यामधील बिस्कीट काढले. त्यानंतर पुडा बहिणीला परत केला. याचा राग गाेपीला आल्याने तिने बिस्किटांचा पुडा फेकून देत गोकुळने जी वीट थापली होती, त्यावर पाय देऊन ती मोडली. याचा राग मनात ठेवत गोकुळने घरात गेल्यानंतर लहान बहिणीचा गळा व मान दाबली. यातच तीचा मृत्यू झाला. घाबरलेल्या भावाने तिला उठवण्याचा प्रयत्न केला असता ती उठली नाही. ही बाब लक्षात येताच शेतमालक घाटोळे यांच्या दुचाकीवर तिच्या नातेवाइकांनी तिला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेले. परंतु, उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला.
चिमुकलीची गळा आवळून हत्या झाल्याचे शनिवारी रात्री समाेर आले. या प्रकरणी गोकुळ गुलाब चौहान (२०) याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने आराेपीस १६ जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.