अकोला : ‘एटीएस’च्या आरोपीची न्यायालयात पेशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 02:08 AM2018-01-12T02:08:12+5:302018-01-12T02:08:27+5:30
अकोला :दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नोंदवलेल्या गुन्ह्यांचे प्रकरणे चालवण्यात येत असलेल्या एटीएसच्या विशेष न्यायालयात पुसद येथील एका प्रकरणाची सुनावणी गुरुवारी झाली. न्यायालयाने या प्रकरणात एकाची साक्ष नोंदवली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नोंदवलेल्या गुन्ह्यांचे प्रकरणे चालवण्यात येत असलेल्या एटीएसच्या विशेष न्यायालयात पुसद येथील एका प्रकरणाची सुनावणी गुरुवारी झाली. न्यायालयाने या प्रकरणात एकाची साक्ष नोंदवली.
पुसद येथे २0१५ मध्ये बकरी ईदच्या दिवशी निघालेल्या रॅलीत दगडफेक झाली होती. यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. आरोपींनी आक्षेपार्ह घोषणाबाजी व दगडफेक केल्याप्रकरणी अब्दुल मलिक अब्दुल रज्जाक याला पुसद पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच्यावर पुसद पोलीस ठाण्यात कलम ३0७ नुसार गुन्हे दाखल केले होते. या तपासात पोलिसांना आरोपीकडून आक्षेपार्ह व देशविघातक कृत्यासंदर्भात कागदपत्रे आढळली होती. तसेच यामध्ये आणखी दोन युवकांचा समावेश असल्याचेही समोर आले होते. नंतर या तिघांवरही अकोला दहशतवाद विरोधी पथकाने देशविघातक कृत्यात सहभागी असण्याच्या संशयावरून गुन्हे नोंदवले होते. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी झाली.
यावेळी यवतमाळ तहसील कार्यालयातील गुट्टे नामक व्यक्तीची साक्ष न्यायालयाने नोंदवली. आरोपीकडून अँड. दिलदार खान व अँड. अली रजाखान यांनी, तर एटीएसच्या वतीने नागपूर येथील अँड. सत्यनाथन यांनी काम पाहिले.