अकोला : माकडांना वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटोरिक्षा उलटला; एक ठार, पाच जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 02:58 PM2020-03-08T14:58:46+5:302020-03-08T14:59:03+5:30
चौकीलाल मुदीलाल पवार (६० रा. वडाळा) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
मूर्तिजापूर (अकोला) : रस्त्यात अचानक आडवे आलेल्या माकडांना वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव आॅटोरिक्षा उलटून एक जण जागीच ठार, तर अन्य पाच जण जखमी झाल्याची घटना पिंजर ते मुर्तीजापूर मार्गावरील कमळखेड फाट्याजवळ रविवार, ८ मार्च रोजी सकाळी दहा वाजताचे सुमारास घडली. चौकीलाल मुदीलाल पवार (६० रा. वडाळा) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
बाशीर्टाकळी तालुक्यातील वडाळा येथील चौकीलाल मुदीलाल,पुरुषोत्तम रावदसा राठोड,रविना शेषराव राठोड, सईबाई भाउराव राठोड, निमाबाई जयराम चव्हाण, रेणकाबाई येजन्ड पवार हे एम.एच.३० ऐ.एफ.४०३ क्रमांकाच्या आॅटोरिक्षाद्वारे वडाळा येथुन मुर्तिजापुरकडे येत होते. कमळखेड फाट्याजवळ अचनाक माकडाचा कळप आडवा आला. माकडांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक दाबल्याने आॅटोरिक्षा उलटला. यामध्ये मुदीलाल पवार हे घटनास्थळीच ठार झाले.अन्य पाच जण जखमी झाले. जखमींना मुर्तिजापुर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. रायसिंग रामराव राठोड यांच्या तक्रारीवरून आॅॅटो चालक मयुर समाधान जाधव रा. जनुना याच्या विरुद्ध कलम २७९,३०४ अ, ३३७,३३८ प्रमाणे ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गोपाल भवाने करीत आहे.(शहर प्रतिनिधी)