अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 02:41 PM2018-04-12T14:41:54+5:302018-04-12T17:22:02+5:30
अकोला: अकोला येथील गांधी-जवाहर बाग या ठिकाणी खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपचे जिल्ह्यातील आमदार व पदाधिकाºयांनी सकाळी ९ वाजतापासून उपोषणास प्रारंभ केला.
अकोला: पंतप्रधान नरेेंंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात देशभरातील सर्व खासदारांनी गुरुवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. या अनुषंगाने अकोला येथील गांधी-जवाहर बाग या ठिकाणी खासदार संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजपचे जिल्ह्यातील आमदार व पदाधिकाऱ्यांनी सकाळी ९ वाजतापासून उपोषणास प्रारंभ केला.
कथित घोटाळ््यांवर पडदे टाकण्यासाठी काँग्रेस व कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने लोकसभा व राज्यसभेत गोंधळ घातल्या जात आहे. यामुळे संसदेचे कामकाज ठप्प पडत आहे. देशात जाती धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काँग्रेससह सर्व विरोधकांनी कंबर कसली असून, यामुळे देशातील सामाजिक सलोखा धोक्यात सापडला आहे. हा प्रकार लक्षात घेता पंतप्रधान नरेेंंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात देशभरातील सर्व खासदार, आमदार तसेच पदाधिकारी एक दिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अकोल्यात खा. संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी उपोषणास बसले आहेत. उपोषण मंडपात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक हरीश अलिमचंदानी , माजी आमदार वसंतराव खोटरे यांच्यासह भापजचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहेत.