अकोला ग्रंथोत्सव २०१८ : देवालयाइतकीच ग्रंथालयांची आवश्यकता - डॉ. रणजित पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 06:16 PM2019-01-05T18:16:16+5:302019-01-05T18:17:06+5:30

अकोला : माणुस जे वाचतो, तेच लिहितो. वाचलेले कधीच विसरत नसल्याने माणसाच्या जीवनात वाचनाचे वेगळेच महत्त्व आहे. म्हणूनच देवालयाइतकीच ग्रंथालयांचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.

Akola Book Festival 2018: Need of libraries like temples - Dr. Ranjeet Patil | अकोला ग्रंथोत्सव २०१८ : देवालयाइतकीच ग्रंथालयांची आवश्यकता - डॉ. रणजित पाटील  

अकोला ग्रंथोत्सव २०१८ : देवालयाइतकीच ग्रंथालयांची आवश्यकता - डॉ. रणजित पाटील  

Next


अकोला : माणुस जे वाचतो, तेच लिहितो. वाचलेले कधीच विसरत नसल्याने माणसाच्या जीवनात वाचनाचे वेगळेच महत्त्व आहे. म्हणूनच देवालयाइतकीच ग्रंथालयांचीही आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग अंतर्गत ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे शनिवारी दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद््घाटक करण्यात आले. या प्रसंगी उद््घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यक माजी संमेलन अध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे डॉ. विठ्ठल वाघ होते. यावेळी विदर्भ चेंबर्स आॅफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष महेंद्र दर्डा, सहायक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील, जिल्हा ग्रंथपाल अतुल वानखडे, ग्रंथमित्र डॉ. एस.आर. बाहेती कृषि किर्तनकार महादेवराव भुईभार डॉ. पुरूषोत्तम तायडे, डॉ. अशोक ओळंबे , नगरसेवक आशिष पवित्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले की, एक जबाबदार नागरीक म्हणून प्रत्येकाने वाढदिवसासह इतरत्र पैसा खर्च करण्यापेक्षा पुस्तके खरेदी करून ग्रंथालयांना भेट द्यावी,असेही आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे ग्रंथपाल अतुल वानखडे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत चांगड यांनी, तर आभार प्रदर्शन मनोज देशमुख यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी वाशिम जिल्ह्यातील केत उमरा स्थित अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. दिग्रस तालुक्यातील वसंत नगर येथील प्रताप महिला मंडळाने बंजारा गीत सादर केले.यावेळी पालकमंत्री यांनी पुस्तकांचे स्टॉलचे उद्घाटन केले. या ग्रंथोत्सवात विविध पुस्तक प्रकाशकांनी आपले पुस्तके प्रदर्शनी व विक्रीसाठी ठेवले आहेत. पुस्तक प्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



ग्रंथ दिंडीने दुमदुमले शहर

सकाळी 9.30 वाजता जिल्हा ग्रंथालय येथुन ग्रंथ दिडींचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथ दिडींला महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून ग्रंथोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ?ड. मोतीसिंह मोहता , महादेवराव भुईभार, एस.आर. बाहेती, ?ड. मोहन आसरकर, राम मुळे, सहायक ग्रंथालय संचालक जगदीश पाटील, जिल्हा ग्रंथपाल अतुल वानखडे , ग्रंथालय कार्यालयाचे नवल कव्हळे ,विविध वाचनालयाचे पदाधिकारी ग्रंथोत्सव संयोजन समितीचे सदस्य तसेच विविध शाळेचे विदयार्थी यांची उपस्थिती होती. टाळ मृदंगाच्या गजरात सकाळी निघालेली ग्रंथ दिंडी शहरातील ग्रंथ प्रेमींचे लक्ष वेधुन घेत होती.

 

Web Title: Akola Book Festival 2018: Need of libraries like temples - Dr. Ranjeet Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.