अकोला : डीझल खरेदी-विक्रीमध्ये घोळ घालणारे महाबीजमधील दोघे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:39 AM2018-05-06T01:39:26+5:302018-05-06T01:39:26+5:30
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)मधील अधिका-यांच्या वाहनांमध्ये डीझल घोटाळा करून ९७३ लीटर डीझलची हेराफेरी करणाºया दोघांना महाबीज प्रशासनाने निलंबित केले आहे; मात्र फौजदारी कारवाई करताना महाबीज प्रशासनाने केवळ पेट्रोल पंप संचालकांची नावे देऊन कर्मचाºयांना वाचविण्यासाठी अर्धवट कारवाई केल्याने यामध्ये महाबीजचे अधिकारीही सहभागी असल्याचा संशय वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)मधील अधिका-यांच्या वाहनांमध्ये डीझल घोटाळा करून ९७३ लीटर डीझलची हेराफेरी करणाºया दोघांना महाबीज प्रशासनाने निलंबित केले आहे; मात्र फौजदारी कारवाई करताना महाबीज प्रशासनाने केवळ पेट्रोल पंप संचालकांची नावे देऊन कर्मचा-यांना वाचविण्यासाठी अर्धवट कारवाई केल्याने यामध्ये महाबीजचे अधिकारीही सहभागी असल्याचा संशय वाढला आहे.
महाबीजमध्ये कार्यरत असलेल्या काही कर्मचाºयांनी २७ बनावट पावत्यांच्या आधारे ९७३ लीटर डीझलचा अपहार केला होता. या प्रकरणात महाबीज प्रशासनाने केलेल्या विभागीय चौकशीत घोटाळा झाल्याचे उघड झाले, त्यानंतर खदान पोलीस ठाण्यात मे. एम. आर. वजीफदार अॅण्ड सन्स पेट्रोल पंप व कर्मचारी राजेशमळी पारसनाथ तिवारीविरुद्ध तक्रार देण्यात आली. यामध्ये सहभागी असलेल्या कर्मचाºयांवर मात्र फौजदारी कारवाई करण्यासाठी महाबीज प्रशासनाने अर्धवट कारवाई केल्याचे दिसून येत आहे. महाबीज प्रशासनाने त्यांचे दोन शिपाई प्रफुल्ल शेगावकर व सुभाष इंगळे यांच्याकडून अपहाराची प्रत्येकी २० हजार रुपये वसुली केली व त्यांना निलंबित केले. या प्रकरणामध्ये वसुली झाल्यानंतर प्रकरण तिथेच न थांबवता महाबीज प्रशासनाने पोलिसांत तक्रार देताना या कर्मचाºयांना मात्र वगळल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. महाबीजचे सहायक व्यवस्थापक प्रबोध धांदे यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी मे. एम. आर. वजीफदार अॅण्ड सन्स पेट्रोल पंप व कर्मचारी राजेशमळी पारसनाथ तिवारीविरुद्ध भादंविचे कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे; मात्र या प्रकरणात दोषी आढळणाºया कर्मचाºयांना वगळले. पेट्रोल पंपावर एकतर्फी कारवाई केल्यामुळे हे प्रकरण आता महाबीजवर शेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.