अकोला : हेक्टरी १३ क्विंटल तुरीची खरेदी; र्मयादा वाढल्याने शेतकर्यांची अडचण दूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:44 AM2018-02-08T02:44:13+5:302018-02-08T02:44:38+5:30
v
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय तूर खरेदी केंद्रात आता शेतकर्याच्या सात-बारावर नोंद असलेल्या संपूर्ण क्षेत्रातील तुरीची खरेदी केली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी झाला. त्यानुसार आता शेतकर्यांकडून हेक्टरी १३ क्विंटल तूर खरेदी होईल. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी सातत्याने या मागणीचा पाठपुरावा केल्याने शासनाने ती मान्य केली आहे.
राज्यात सोयाबीन, मूग अशा द्विदल पिकासोबत तूर आंतर पीक पेरणी केली जात असून, कृषी विभागाच्यावतीने या पिकाची हेक्टरी उत्पादकता काढून सहकारी खरेदी-विक्री संघाला कळविण्यात येत असते. खरेदी केंद्रावर तूर विक्रीला आणण्यापूर्वी तलाठय़ाकडून सात- बारा उतार्यावर दोन्ही पिकांच्या क्षेत्राची नोंद केल्या जाते; पण ही नोंद अध्र्या-अध्र्या क्षेत्राची केली जात असल्याने, खरेदी-विक्री संघाकडून पिकाच्या उत्पादनाची नोंद घेताना अर्धेच क्षेत्र गृहित धरण्यात येते. प्रत्यक्षात तूर ही सर्व क्षेत्रावर असते. तूर पिकाचा विस्तार मोठा असल्याने, हे पीक पूर्ण क्षेत्रावर विस्तारलेले असते. विशेष म्हणजे तूर पिकाच्या एकल पेरणी दरम्यानसुद्धा दोन ओळींमधील अंतर सारखेच असते. त्यामुळे तूर पिकाचे क्षेत्र अर्धे गृहित न धरता पूर्ण धरूनच तूर उत्पादनाची नोंद घेणे आवश्यक होते. आतापर्यंत तसे होत नसल्याने शेतकर्यांवर अन्याय झाला आहे.
त्यामुळे शेतकर्यांमध्ये शासनाप्रती नाराजीचा सूर आहे. याबाबत अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली.
तूर (आंतर पिकासाठी) उत्पादनाची नोंद करताना अध्र्या क्षेत्राऐवजी पूर्ण क्षेत्र गृहित धरूनच तूर उत्पादनाची नोंद घ्यावी. शेतकर्यांनी प्रत्यक्ष पिकविलेला माल खरेदी केंद्रातून परत जाऊ नये, यासाठीच्या सूचनाही देण्यात आल्या. त्यानंतर हा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीतही घेण्यात आला. त्यानुसार आता संपूर्ण क्षेत्रात उत्पादित झालेली हेक्टरी १३ क्विंटल तूर खरेदी केली जाणार आहे.