अकोला : मालवाहू वाहनाची धडक; चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 02:39 AM2018-02-08T02:39:47+5:302018-02-08T02:41:29+5:30

अकोला : घराजवळच रस्त्यावर खेळणार्‍या अडीच वर्षीय मुलीला मालवाहू वाहनाने धडक दिल्याची घटना ३0 जानेवारी रोजी कौलखेडमधील नागे ले-आऊटमध्ये घडली.  अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; परंतु उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. चिमुकल्या मुलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Akola: the cargo hit the vehicle; The death of a sperm | अकोला : मालवाहू वाहनाची धडक; चिमुकलीचा मृत्यू

अकोला : मालवाहू वाहनाची धडक; चिमुकलीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देकुटुंबातील एकुलती एक मुलगी चिमुकलीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : घराजवळच रस्त्यावर खेळणार्‍या अडीच वर्षीय मुलीला मालवाहू वाहनाने धडक दिल्याची घटना ३0 जानेवारी रोजी कौलखेडमधील नागे ले-आऊटमध्ये घडली.  अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले; परंतु उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. चिमुकल्या मुलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
कौलखेड परिसरातील नागे ले-आऊटमध्ये राहणारे सचिन संजीव कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची अडीच वर्षाची मुलगी आराध्या ही दुपारी घराबाहेर रस्त्यावर खेळत होती. दरम्यान, घराशेजारीच राहणारे विजु खरे यांच्या मालकीच्या मालवाहू वाहनाने मुलीला धडक दिली. यात मुलगी गंभीर जखमी झाली. मुलीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गत आठ दिवसांपासून चिमुकल्या आराध्याचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत होते; परंतु मंगळवारी दुपारी तिचा करूण अंत झाला.  सचिन कोकाटे यांची आराध्या ही एकुलती एक आणि घरात सर्वांची लाडकी होती.  तिच्या मृत्यूमुळे कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. त्यांचा हल्लकल्लोळ पाहून उपस्थितानासुद्धा गहिवरून आले.  खदान पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी चालक विजु खरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचे एमएच ३0 एव्ही 00३४ क्रमांकाचे मालवाहू वाहन पोलिसांनी जप्त केले. 

Web Title: Akola: the cargo hit the vehicle; The death of a sperm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.