Akola: ८० हजारांच्या दाेन गायींची चाेरी

By सचिन राऊत | Published: May 19, 2024 09:34 PM2024-05-19T21:34:30+5:302024-05-19T21:34:47+5:30

Akola Crime News: नवीन हींगना वाशिम राेड येथील रहीवासी कंत्राटदाराच्या दाेन गायी अज्ञात चाेरटयांनी पळविल्याची तक्रार जुने शहर पाेलिस ठाण्यात देण्यात आली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून चाेरीला गेलेल्या दाेन गायींचा शाेध सुरु केला आहे.

Akola: Chari of 80 thousand cows | Akola: ८० हजारांच्या दाेन गायींची चाेरी

Akola: ८० हजारांच्या दाेन गायींची चाेरी

- सचिन राऊत 
अकाेला - नवीन हींगना वाशिम राेड येथील रहीवासी कंत्राटदाराच्या दाेन गायी अज्ञात चाेरटयांनी पळविल्याची तक्रार जुने शहर पाेलिस ठाण्यात देण्यात आली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून चाेरीला गेलेल्या दाेन गायींचा शाेध सुरु केला आहे.
पुरुषोत्तम जयराम अहिर वय ४५ वर्ष रा. नवीन हिंगणा वाशिम रोड यांनी जुने शहर पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची एक लालसर रंगाची गाय किंमत अंदाजे ५० हजार रुपये तसेच एक भुरकट लाल रंगाची दुसरी गाय कींमत अंदाजे ३० हजार रुपये असा एकूण ८० हजार रुपयांच्या दाेन गायी जिराफे लेआउट, झांबरे लेआउट, कोरडे लेआउट या परिसरातून चाेरीला गेल्याचे नमुद केले. यावरुन जुने शहर पाेलिसांनी अज्ञात चाेरटयांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणातील चाेरटयांचा शाेध सुरु केला असून गायींचाही शाेध पाेलिस घेत आहेत.

Web Title: Akola: Chari of 80 thousand cows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.