अकोला शहरातील गुन्हेगारी टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:00 AM2020-09-09T11:00:26+5:302020-09-09T11:00:33+5:30
शेख जुनेद शेख निजाम वय २७ वर्ष व त्याचा साथीदार आकाश रामा निनोरे वय २४ वर्ष राहणार गाडगे नगर जुने शहर या दोघांवर विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहे.
अकोला : शहरातील काही भागात टोळीने गुन्हे करणाºया गुंडांचा हैदोस प्रचंड वाढला असतानाच या गुन्हेगारी टोळ्यांवर अंकुश मिळविण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी कारवाईचा दंडुका उगारला असून, जुने शहरातील हमजा प्लॉट येथील रहिवासी असलेल्या दोन गुंडांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश त्यांनी मंगळवारी सायंकाळी दिला.
जुने शहरातील हमजा प्लॉट येथील रहिवासी शेख जुनेद शेख निजाम वय २७ वर्ष व त्याचा साथीदार आकाश रामा निनोरे वय २४ वर्ष
राहणार गाडगे नगर जुने शहर या दोघांवर विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल असून, त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती अद्यापही कायम आहे. या दोघांनी टोळीने गुन्हे करण्याचे प्रमाण सुरूच ठेवल्याने सिटी कोतवाली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दोन वर्ष जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी मंगळवारी मंजुरी दिल्यानंतर या दोन्ही गुंडांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. टोळीने गुन्हेगारी करणाऱ्यांवर वचक मिळविण्यासाठी पोलिसांनी आता त्यांचे प्रस्ताव तयार करणे सुरू केले आहे. अशाप्रकारे गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक या प्रमाणेच कारवाई करणार असल्याची माहिती आहे. या दोन आरोपींवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने त्यांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या दोघांवर कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेष सपकाळ व सिटी कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.