अकोला : कट्यार येथे दोन गटांत हाणामारी; आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:25 AM2017-12-30T01:25:01+5:302017-12-30T01:25:55+5:30

बोरगाव मंजू : ग्रामपंचायत उपसरपंचांच्या निवडणुकीवरून कट्यार येथे दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी १७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Akola: A clash between two groups at Katyar; Eight injured | अकोला : कट्यार येथे दोन गटांत हाणामारी; आठ जखमी

अकोला : कट्यार येथे दोन गटांत हाणामारी; आठ जखमी

Next
ठळक मुद्दे१७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरगाव मंजू : ग्रामपंचायत उपसरपंचांच्या निवडणुकीवरून कट्यार येथे दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी १७ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बोरगाव मंजू पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कट्यार येथे ग्रामपंचायत सरपंच पदभार व उपसरपंच निवड होती. दरम्यान, या निवडणुकीतून वाद होऊन दोन गटांत हाणामारी झाली. श्रीकिसन बावस्कर रा. कट्यार यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गावातील सरपंच पदग्रहण व उपसरपंच निवडणूक झाल्यानंतर सरपंच देवीदास भारसाकडे हे बाहेर येताच जय ठाकरे याने त्यांना म्हटले की, तू या गावातून निवडून आला तुला लोकांनी कसा पाठिंबा दिला तेच पाहतो, असे बोलून काठी विटांनी जय ठाकरे, संदीप ठाकरे, राजू सोळंके, गजानन सोळंके, मंगेश डाबेराव, राजू डाबेराव, रवी ठाकरे, उमेश डाबेराव, सुभाष कडू, रामसिंग सोळंके, उत्तम सोळंके, आकाश सोळंके, आनंद डाबेराव, गजानन साबे, ज्ञानेश्‍वर साबे, झाबुराव देशमुख, प्रवीण ढोरे, यांनी संगनमत करून मारहाण केली. बावस्कर यांच्या फिर्यादीवरून १७ जणांविरुद्ध  गुन्हे दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

येवता येथे पोलिसांना मारहाण
विझोरा : येथून जवळच असलेल्या येवता येथे उपसरपंच पदाची निवडणूक झाल्यानंतर विजयी रॅली काढणार्‍यांना मनाई करणार्‍या दोन पोलीस कर्मचार्‍यांना काही युवकांनी मारहाण केल्याची घटना २९ डिसेंबर रोजी रात्री घडली. या प्रकारानंतर गावात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांना मारहाण करणार्‍यांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. 
येवता येथे २९ डिसेंबर रोजी उपसरपंच पदाची निवडणूक आणि सरपंचांचा पदभार समारंभ आयोजित करण्यात आला होता. उपसरपंचपदी शिवसेनेच्या वंदना सिरसाट यांची निवड झाली. सरपंच रेणुका कुलट यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावातून विजयी रॅली काढली. या रॅलीनंतर उपसरपंचपदी विजयी झालेल्या सिरसाट यांच्या सर्मथकांनीही सायंकाळी गावातून विजयी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, परवानगी नसल्याने रॅली काढण्यास दोन पोलीस कर्मचार्‍यांनी विरोध केला. त्यावरून ग्रामस्थ व पोलिसांमध्ये वाद झाला. त्यातूनच काही युवकांनी या पोलिसांना मारहाण केली. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. तसेच पोलिसांना मारहाण करणार्‍या युवकांना रात्री उशिरापर्यंत अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. 
 

Web Title: Akola: A clash between two groups at Katyar; Eight injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.