लाखनवाडा येथे दोन गटात सशस्त्र हाणामारी, दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:30 IST2019-08-20T18:30:45+5:302019-08-20T18:30:49+5:30
पूर्वमैनस्यातून दोन गटात हाणामारी होउन दोन ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.

लाखनवाडा येथे दोन गटात सशस्त्र हाणामारी, दोन ठार
बाळापूर(अकोला) : पूर्वमैनस्यातून दोन गटात हाणामारी होउन दोन ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गंत येत असलेल्या लानखवाडा येथे २० आॅगस्ट रोजी घडली. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.
लाखनवाडा येथील दोन गटात अकोला शहरानजीक असलेल्या चांदूर सातमोरी भागात वाद झाला. तेथे काही जणांनी एकास मारहाण केली. तेथून मारहाण झालेला युवक लाखनवाडा येथे आला. तेथे दहा ते बारा जणांनी त्या युवकासह दोघांवर कुºहाडी आणि धारधार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अकोला जुने शहर पोलीस आणि बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण दुधाजी डाबेराव (४०) यांचा मृत्यू झाला. तसेच गंभीर जखमींमधील आणखी एकाचा सायंकाळी मृत्यू झाला. गंभीर जखमी असलेल्या एकावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी सचिन दीपक वाकोडे, प्रवीण दीपक वाकोडे, सागर संतोष शिरसाट यांना ताब्यात घेतले.या प्रकरणी बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
२००७ मध्येही झाला होता खून
लाखनवाडा येथे २०१७ मध्ये एकाची हत्या करण्यात आली होती. त्या हत्येच्या घटनेतूनच आज दोघांची हत्या करण्यात आली आहे. दोन्ही गटात २०१७ पासून वाद सुरू असून तो वाद आता विकोपाला गेला आहे.