अकोला : स्वस्त धान्य दुकानदारांचा सोमवारी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 01:08 AM2018-01-14T01:08:00+5:302018-01-14T01:08:11+5:30
अकोला : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे कार्डधारकाला आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून दुकानदारावर प्राणघातक हल्ला करून तोडफोड करण्यात आली. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक संघटनेने सोमवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने दुकानदारांना संरक्षण देण्याची मागणीही संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शत्रुघ्न मुंडे यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मालेगाव येथील दुकानदार गणेश तिवारी यांच्यावर हल्ला केल्याने त्यांना अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या भ्याड हल्लेखोरांना त्वरित अटक करावी, पॉस मशीन दुरुस्त करूनच त्यावरून वाटप करण्याचा आदेश द्यावा, आधार कार्ड शंभर टक्के लिंक झाल्यानंतरच मशीनवरून वाटपाचा आदेश द्यावा, या मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये प्रचंड त्रुटी असल्याने कार्डधारक दुकानदारांनाच लक्ष करीत आहेत. विशेष म्हणजे, वाशिम जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी आधारशिवाय धान्य देऊ नये, असा आदेश दिला आहे. त्यातून दुकानदारांवर दहशत पसरवली आहे. त्यासाठी दुकानदारांना आर्थिक व मानसिक त्रास दिला जात आहे. त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. दरम्यान, जखमी दुकानदार तिवारी यांची मुंडे यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली.
संपूर्ण राज्यभरातच दुकाने बंद
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख, खासदार गजानन बाबर यांनी संपूर्ण राज्यभरातील दुकाने १५ जानेवारी रोजी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून एकजुटीने लढा द्यावा, मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या घटना घडू नयेत, तसेच पॉस मशीनने धान्य देणे बंद करावे, यासाठी निवेदन दिले जाणार आहे. त्यासाठी दुकानदारांनी सोमवारी दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन राज्य उपाध्यक्ष मुंडे यांच्यासह शहर अध्यक्ष योगेश अग्रवाल यांनी केले आहे.