अकोला : कोयम्बटूर-भगत की कोठी एक्स्प्रेस मे अखेरपर्यंत धावणार
By Atul.jaiswal | Published: April 6, 2024 03:45 PM2024-04-06T15:45:31+5:302024-04-06T15:45:52+5:30
या गाडीला अकोला स्थानकावर थांबा असणार आहे.
अकोला : आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने कोयम्बटूर ते भगत की कोठी या दोन स्थानकांदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीला अकोला स्थानकावर थांबा असणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेतील सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०६१८१ काेयम्बटूर-भगत की कोठी साप्ताहि विशेष एक्स्प्रेस ११ एप्रिल ते २३ मे या कालावधीतसून दर गुरुवारी कोयम्बटूर येथून २:३० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ११:३० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. येथून रवाना झाल्यानंतर भुसावळ, जळगाव मार्गे राजस्थान राज्यातील भगत की कोठी येथे शनिवारी सकाळी ९:५० वाजता पोहोचणार आहे. प
रतीच्या प्रवासात ०६१८२ भगत की कोठी-कोयम्बटूर ही गाडी १४ एप्रिल ते २६ मे या कालावधीत दर रविवारी सायंकाळी ७:३० वाजता भगत की कोठी येथून रवाना होऊन त्याच दिवशी रात्री २२:२० वाजता अकोला येथे येणार आहे. येथून रवाना झाल्यानंतर वाशिम, नांदेड, काचीगुडा मार्गे कोयम्बटूर येथे मंगळवारी सकाळी ९:३० वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या अप व डाऊन मार्गावर प्रत्येक सात अशा एकूण १४ फेऱ्या होणार आहे