Akola: अकोला मार्गे कोयम्बटूर-भगत की कोठी होली स्पेशल रेल्वे गुरुवारपासून

By Atul.jaiswal | Published: March 13, 2024 06:26 PM2024-03-13T18:26:40+5:302024-03-13T18:27:05+5:30

Akola Railway News: आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता दक्षीण-मध्य रेल्वेने कोयम्बटूर ते भगत की कोठी या दोन स्थानकांदरम्यान आठवड्यातून एकदा होळी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Akola: Coimbatore-Bhagat Ki Kothi Holi Special Train via Akola from Thursday | Akola: अकोला मार्गे कोयम्बटूर-भगत की कोठी होली स्पेशल रेल्वे गुरुवारपासून

Akola: अकोला मार्गे कोयम्बटूर-भगत की कोठी होली स्पेशल रेल्वे गुरुवारपासून

- अतुल जयस्वाल
अकोला : आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता दक्षीण-मध्य रेल्वेने कोयम्बटूर ते भगत की कोठी या दोन स्थानकांदरम्यान आठवड्यातून एकदा होळी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार, १४ मार्चपासून सुरु होणार असलेल्या या साप्ताहिक गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलकर प्रवाशांची सोय होणार आहे.

दक्षिण मध्य रेल्वेतील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०६१८१ काेयम्बटूर-भगत की कोठी होळी विशेष एक्सप्रेस १४ मार्च पासून दर गुरुवारी कोयम्बटूर येथून २:३० वाजता कोयम्बटूर येथून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी ११:३० वाजता अकोला स्थानकावर येणार आहे. येथून रवाना झाल्यानंतर भूसावळ, जळगाव मार्गे राजस्थान राज्यातील भगत की कोठी येथे शनिवारी सकाळी ९:५० वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या ४ एप्रिलपर्यंत चार फेऱ्या होणार आहेत. परतीच्या प्रवासात ०६१८२ भगत की कोठी-कोयम्बटूर ही गाडी १७ मार्चपासून दर रविवारी सायंकाळी ७:३० वाजता भगत की कोठी येथून रवाना होऊन त्याच दिवशी रात्री २२:२० वाजता अकोला येथे येणार आहे. येथून रवाना झाल्यानंतर वाशिम, नांदेड, काचीगुडा मार्गे कोयम्बटूर येथे मंगळवारी सकाळी ९:३० वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या ७ एप्रिलपर्यंत चार फेऱ्या होणार आहेत.

Web Title: Akola: Coimbatore-Bhagat Ki Kothi Holi Special Train via Akola from Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.